वाचाल तर वाचाल! मुलांना वाचनाची आवड लावण्यासाठी फॉलो करा ‘या’ टिप्स

Develop Reading Habit: खूप कमी पालक असतील ज्यांना आपल्या मुलांची वाचनाची सवय सुधारायला आवडणार नाही. मात्र, तंत्रज्ञानामुळे आजकाल तसे करणे अवघड झाले आहे. मुले टीव्ही किंवा गेम अॅपला जास्त वेळ देण्यास प्राधान्य देतात. अशा परिस्थितीत मुले पुस्तके वाचण्यात फार कमी रस दाखवतात. उन्हाळ्याच्या सुट्ट्या त्यांच्या वाचनाची सवय सुधारण्यासाठी उत्तम वेळ आहे. अशा परिस्थितीत, येथे काही टिप्स आहेत. पालक या टिप्स फॉलो करून मुलांच्या वाचनाची सवय वाढवू शकतील.

चित्रण पुस्तके
तुम्ही मुलांना चित्रणाची पुस्तके वाचायला देऊ शकता. या पुस्तकांमध्ये भरपूर चित्रे असतात. हे मुलांना पुस्तकांशी कनेक्ट करण्यास मदत करतात. त्यामुळे मुलांची पुस्तके वाचनाची आवड वाढते. अशी पुस्तके मुलांना वाचायला द्या, ज्यात चित्रांसह मोठे लिखाण असेल. त्यामुळे मुले पुस्तकांकडे लवकर आकर्षित होतात.

कौटुंबिक वाचन वेळ
पालक दररोज काही वाचनासाठी थोडा वेळ काढू शकतात. थोडा वेळ काढून तुमच्या आवडत्या पुस्तकाची 1 ते 2 पाने रोज वाचा. म्हणजे तुम्हाला पाहिल्यानंतर मुले तुमच्याकडे आकर्षित होतील. तुम्हाला वाचताना पाहून मुलंही वाचतील. त्यामुळे मुलांनाही पुस्तक वाचण्याची हौस लागेल. अशाने मुलांना पुस्तके वाचण्याची सवयही निर्माण होईल.

आवडते पुस्तक वाचायला द्या
तुम्ही मुलांना त्यांच्या आवडीचे पुस्तक स्वतः निवडू द्या. याच्या मदतीने तुम्हाला मुलांची आवड देखील कळेल. यासोबतच मुले स्वत: त्यांच्या आवडीनुसार पुस्तक निवडतील, तेव्हा ते आवडीने वाचतील. त्यामुळे त्यांना पुस्तके वाचण्याची सवय लागेल. त्यामुळे त्यांना त्यानुसार पुस्तकाची थीम आणि पुस्तके निवडू द्या.

मोठ्याने पुस्तके वाचायला सांगा
मुलांसोबत बसा. त्यांना ते मोठ्याने वाचण्यास सांगा. आपण हे दररोज 15 मिनिटांसाठी करू शकता. मुले जेव्हा पुस्तक वाचत असतील तेव्हा तुम्हीही त्यांच्यासोबत वाचावे. प्रथम एक ओळ वाचा. यानंतर त्यांना पुढील ओळ वाचू द्या. तुम्हीही मुलांसोबत पूर्ण आवडीने वाचा. यामुळे तुमची मुले उत्साहाने पुस्तक वाचतील.

पुस्तकांबद्दल बोला
तुमची मुलं कोणतंही पुस्तक वाचत असतील, त्यांना विचारा की ते कोणते पुस्तक वाचत आहेत. यात तुम्ही काय वाचत आहात. यातून तो काय शिकला? मुलांची कल्पनाशक्ती खूप चांगली असते. त्यांची क्रिएटिव्ह बाजू बाहेर येऊ देत जा.