संत ज्ञानेश्वरनगर एरंडवणा येथील झोपडपट्टीचे पुनर्वसनातील गैरप्रकार थांबवावा –  मेधा कुलकर्णी

कोथरूडच्या माजी आमदार यांनी संत ज्ञानेश्वर नगर, एरंडवणा येथील झोपडपट्टीचे पुनर्वसनाबाबत काही वस्तुस्थिती निदर्शनास आणून दिली आहे. सदरील झोपडपट्टी काम 2017 पासून सुरू झाले होते. अद्याप 2023 सालातील एप्रिल महिना उजाडला तरी ताबे मिळालेले नाहीत आणि काम अजून बऱ्याच प्रमाणात शिल्लक आहे. येथील स्थलांतरित नागरिकांना बाहेर राहावे लागते आहे. त्यांना ज्या ठिकाणी स्थलांतरित करण्यात आले आहे तेथील भाडे आणि मेंटेनन्स सुद्धा ठरल्याप्रमाणे बांधकाम व्यावसायिक देत नाहीत. त्याचा भुर्दंड नागरिकांना भरावा लागतो आहे. मूळ हक्कदारांना घरे नाहीत. बाहेरील व्यक्तींना घरे दिली जात आहेत असे कळते.

या बांधकामामध्ये अनेक त्रुटी आणि दोष आहेत आणि नागरिकांना अॅग्रीमेंटमध्ये शाश्वती दिलेल्या अनेक बाबी पाळल्या गेलेल्या नाहीत असे निदर्शनास आले आहे. बऱ्याच फ्लॅट्स मध्ये दिवसाही पूर्णपणे काळोख असतो. प्रत्येक फ्लॅटमध्ये आतमध्ये बीम आलेले आहेत. त्यामुळे मुळात छोट्या जागेत अजून अडथळे निर्माण झाले आहेत. घरात एकही सलग भिंत मिळत नाही, जिथे घरातील सामान, कपाट, पलंग लावला जाईल. मुदतीचे बंधन सुद्धा पाळले गेलेले नाही. 3 वेळा प्लॅन revise करण्यात आला आहे ज्या अर्जावर जागा मालकाची सही नाही.

मूळ पुनर्वसनाच्या लोकांना ताबे देण्याअगोदर Zudio च्या मॉल ला ताबा देऊन चालू सुद्धा केला आहे. तरी संबंधित बांधकाम व्यावसायिकावर योग्य करीत आहे. कडक कारवाई करण्यात यावी अशी विनंती तसेच पार्ट completion ची copy, 3 revise केलेले plans, SRA च्या घराच्या रचनेची नियमावली आणि RCC ची परवानगीची कागदपत्रे मिळावीत. झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरणाचे मुख्य कार्यकारी अधिकारी नीलेश गटणे यांची संत ज्ञानेश्वर नगर येथील रखडलेल्या प्रकल्पाच्या संदर्भात नागरिकांसमवेत भेट घेऊन चर्चा केली आणि निवेदन दिले व कारवाईची मागणी केली. असे प्रा. डॉ. मेधा विश्राम कुलकर्णी उपाध्यक्ष, राष्ट्रीय महिला मोर्चा माजी आमदार, कोथरूड यांनी झोपडपट्टीचे पुनर्वसनाचे पवार यांच्याकडे प्रत देण्यात आली.