“आयपीएल जिंकणे विश्वचषक जिंकण्यापेक्षा कठीण”, रोहितच्या बचावात सौरव गांगुलीचा अजब युक्तीवाद

वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या अंतिम सामन्यात (WTC Final) ऑस्ट्रेलियाने भारताचा 209 धावांनी पराभव केला. रोहित शर्माच्या (Rohit Sharma) नेतृत्वाखाली भारताला सलग दुसऱ्यांदा आयसीसी स्पर्धा जिंकण्यात अपयश आले. आयसीसी स्पर्धेच्या अंतिम फेरीतील भारताचा हा चौथा पराभव होता आणि WTC अंतिम सामन्यातील सलग दुसरा पराभव होता.

सौरव गांगुलीच्या (Sourav Ganguly) बीसीसीआय अध्यक्षपदाच्या कार्यकाळात रोहितला सर्व फॉरमॅटमध्ये भारताचा कर्णधार म्हणून नियुक्त करण्यात आले होते. दरम्यान, भारतीय कर्णधार म्हणून दुसर्‍यांदा अपयशी ठरल्यानंतर बीसीसीआयचे माजी अध्यक्ष सौरव गांगुली यांनी अनोखे विधान करून रोहितचा बचाव केला आहे, ज्यामुळे माजी भारतीय कर्णधार सोशल मीडियावर ट्रोल झाला आहे.

माझा रोहितवर पूर्ण विश्वास आहे. त्याने आणि एमएस धोनीने 5 आयपीएल विजेतेपदे जिंकली आहेत. आयपीएल जिंकणे सोपे नाही आणि ती एक कठीण स्पर्धा आहे. विश्वचषक जिंकण्यापेक्षा आयपीएल जिंकणे कठीण आहे. कारण आयपीएलमध्ये 14 सामने जिंकल्यानंतर तुम्ही प्लेऑफमध्ये पोहोचता. विश्वचषकाच्या उपांत्य फेरीत प्रवेश करण्यासाठी फक्त 4-5 सामने खेळावे लागतात. आयपीएलमध्ये चॅम्पियन होण्यासाठी तुम्हाला 17 सामने खेळावे लागतात, असे रोहितच्या बचावात गांगुली म्हणाला आहे.