देवेंद्रजी पातेलंभर तुपासह ३५ पुरणपोळ्या सहज खायचे; अमृता फडणवीसांनी सांगितली खास आठवण

मुंबई : विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्या पत्नी अमृता फडणवीस (Amruta Fadnavis) झी मराठी वाहिनीवरील ‘किचन कल्लाकार’ (Kitchen Kallakar) या सुप्रसिद्ध कार्यक्रमात सहभागी झाल्या आहेत. यावेळी मिसेस फडणवीसांनी अनेक धमाल किस्से सांगून प्रेक्षकांचं मनोरंजन केलं आहे.

या कार्यक्रमात फडणवीसांच्या खवय्येगिरीबद्दल खुद्द त्यांच्या पत्नी अमृता फडणवीसांनी (Amruta Fadnavis) मोठा गौप्यस्फोट केला . एका बैठकीत देवेंद्रजी किती पुरणपोळ्या खाऊ शकतात, असा प्रश्न अमृता फडणवीस यांना सूत्रसंचालक असलेला प्रसिद्ध अभिनेता, कवी संकर्षण कऱ्हाडेने विचारला. यावर, ते ३० ते ३५ पुरणपोळ्या सहज पातेलंभर तूपासोबत खायचे, असे उत्तर अमृता फडणवीस यांनी दिले.

पुढे लग्नानंतर तुमची अपूर्ण राहिलेली इच्छा कोणती, या प्रश्नावर त्यांना ३० ते ३५ पुरणपोळ्या खाताना पाहण्याची, त्याही मी न बनवलेल्या, असे मिश्किल उत्तर मिसेस फडणवीस यांनी दिले. दरम्यान, झी मराठीच्या किचन कल्लाकार या कार्यक्रमात अमृता फडणवीस सहभागी झाल्या. हा एपिसोड अजून प्रसारित झालेला नाही. लवकरच हा भाग प्रसारित होणार आहे.