#SanjayRaut मेरा पैसा वापस कर ! भाजप नेत्याच्या ट्वीटची सोशल मिडीयावर चर्चा 

मुंबई – शिवसेना नेते खासदार संजय राऊत यांच्या पत्रकार परिषदेनंतर भाजप आणि शिवसेनेत चांगलाच वाद पेटला आहे. यातच आता संजय राऊत यांनी देवेंद्र फडणवीस यांचा फ्रंटमॅन म्हणत मोहित कंबोज यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप केले आहेत. यानंतर आता, मोहित कंबोजने यावरुन राऊत यांना पलटवार केला आहे.

राऊत यांनी आरोप केल्यानंतर आता मोहित कंबोज यांनी केलेले एक ट्वीट चांगलेच चर्चेत आले आहे. संजय राऊतांनी माझ्याकडून अनेकदा पैसे घेतल्याचं त्यांनी यापूर्वीच सांगितले होते आज त्यांनी ट्वीट करत संजय राऊत यांनी आपले पैसे परत करावेत अशी मागणी केली आहे.

दरम्यान, काम्बोज यांच्या या पोस्टवर राऊत यांची चांगलीच खिल्ली उडवली जात आहे. पाहूयात असेच काही माजेषित ट्वीटस

https://twitter.com/AbhishekRaut559/status/1494236640595771393?s=20