राज ठाकरेंच्या अयोध्या दौऱ्याला विरोध करणाऱ्या ब्रिजभूषणवर देवेंद्र फडणवीसांनी दिली ‘ही’ प्रतिक्रिया

मुंबई – मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे (MNS president Raj Thackeray) यांच्या अयोध्या (Ayodhya) दौऱ्यासाठी पक्षाकडून जय्यत तयारी सुरु असताना दुसरीकडे उत्तर प्रदेशात मात्र त्यांना रोखण्याची तयारी सुरु झाली आहे. उत्तर भारतीयांची जाहीरपणे माफी मागितल्यशिवाय त्यांना अयोध्येत घुसू देणार नाही, असा इशारा देत भाजपाचे खासदार बृजभूषण शरण सिंह (BJP MP Brijbhushan Sharan Singh) यांनी दिला आहे.

राज ठाकरे यांनी ५ जून रोजी अयोध्येला जाऊन रामलल्लाचे दर्शन घेणार असताना भाजपाचे कैसरगंजचे खासदार बृजभूषण सिंह (BJP’s Kaisarganj MP Brijbhushan Singh) यांनी स्वत:ला प्रसिद्धीच्या झोतात आणि स्वपक्षाला अडचणीत आणले आहे. महाराष्ट्रामध्ये भाजपाचे नेते राज ठाकरे यांची पाठराखण करत असले तरी उत्तर प्रदेशातील भाजपा खासदाराने मात्र राज यांना आव्हान दिले आहे.

या पार्श्वभूमीवर रामाच्या दर्शनासाठी कोण जात असेल. तर कोणाला रामाच्या दर्शनापासून कोणाला रोखू नये, अशी भूमिका विधानसभा विरोधी पक्षनेता देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले. मनसे अध्यक्ष राज ठाकरे हे ५ जून रोजी अयोध्या दौऱ्याला जाणार आहेत. राज ठाकरेंच्या अयोध्या दौऱ्याला होणाऱ्या विरोधावर पत्रकारांनी प्रश्नवर देवेंद्र फडणवीस म्हणाले, राज ठाकरेंच्या अयोध्या दौऱ्याच्या विरोध करण्याचे ब्रिजभूषण यांचे काय कारण आहे, हे मला माहिती नाही. माझे त्यांच्याशी बोलणे झालेले नाही. माझे एक स्पष्ट मत आहे की, रामाच्या दर्शनासाठी कोण जात असेल. तर त्यांना रामाच्या दर्शनापासून कोणाला रोखू नये. कोणाला विरोध करण्याचे कारण नाही. मला ब्रिजभूषण यांच्याशी चर्चा करण्याची काही अवश्यकता नाही.