‘सुप्रियाताईंनी जगतापांची हकालपट्टी करून त्या महिलांच्या मागे उभ्या आहेत हे दाखवून द्यावे’

पुणे : शहरातील अन्नधान्य वितरणच्या विभागीय कार्यालयात पुरवठा निरीक्षक आणि कर्मचारी यांच्यासोबत वाद घालून शिवीगाळ करत महिला अधिकार्‍याचा विनयंभग (Depression of female officers) केल्याप्रकरणी माजी नगरसेवक सुभाष जगताप (Subhash Jagtap) (रा. महात्मा गांधी सोसायटी , सहकारनगर) यांविरोधात समर्थ पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. (Former corporator Subhash Jagtap)  याप्रकरणी अन्नधान्य वितरण कार्यालयातील (Cereal Distribution Office) पुरवठा कार्यालयातील महिलेने फिर्याद दिली आहे.

हा प्रकार 2 जून रोजी सोमवार पेठ येथील जुनी जिल्हा परिषद येथील तिसर्‍या मजल्यावरील कार्यालयात घडला. सुभाष जगताप हे परिमंडळ विभागाचे दक्षता समितीचे सदस्य आहेत. त्यांच्या भागातील नागरिकांचे रेशनकार्ड संबंधातील कागदपत्रे आणलेली होती. यावेळी, फिर्यादी या त्यांच्या सहकारी कर्मचार्‍याशी बोलत असताना जगताप यांनी फिर्यादी यांना मोठमोठ्याने आरडाओरड करत शिवीगाळ केली.

त्यानंतर त्यांना स्पर्श करून मनास लज्जा वाटेल असे वर्तन करून नोकरी घालविण्याची धमकी (Threat) दिली. याखेरीज पाहून घेण्याची धमकी देत त्यांना कार्यालयातील अन्य सहकारी व उपस्थित नागरिकांसमोर अपमानित करून त्यांच्या शासकीय कामकाजात अडथळा केल्याचे फिर्यादित नमूद करण्यात आले आहे.

दरम्यान, आता या मुद्द्यावरून भाजपाचे नेते धनंजय जाधव (BJP leader Dhananjay Jadhav) यांनी राष्ट्रवादीवर टीका केली आहे. ते म्हणाले,  सुप्रियाताई सुळे (Supriyatai Sule) राज्याच्या महाराणी असल्या गत म्हणाल्या होत्या की जो महिलांच्या अंगावर हात टाकेल त्याचा हात कलम केला जाईल. मग काय कोण तलवार आणून देण्याची वाटत पाहत आहेत काय त्या?  जर खऱ्याच तुम्ही शब्दात फरक करत नसाल तर काढा त्यांना पार्टीतून आणि दाखवा तुम्ही महिलांच्या मागे ठाम उभ्या आहेत. असं जाधव यांनी म्हटले आहे.