शरद मोहोळ प्रकरणात मोठी माहिती समोर, कऱ्हाडमधून पिस्तुल पुरवणाऱ्या तरुणाला अटक

Sharad Mohol Murder New Update: पुण्यातील कुख्यात गुंड शरद मोहोळ (Sharad Mohol) याच्या हत्या प्रकरणात नवीन अपडेट समोर आली आहे. भरदिवसा गोळी घालून शरद मोहोळची हत्या (Sharad Mohol Murder) करण्यात आली होती. या प्रकरणात पोलिसांनी काही तासांत आठ जणांना ताब्यात घेतले होते. या प्रकरणात मुख्य आरोपी साहिल उर्फ मुन्ना पोळेकर असून तो शरद मोहोळ याचा साथीदार आहे. शिवाय रवींद्र पवार आणि संजय उड्डाण हे पुण्यातील दोन नामांकित वकीलही या कटात सहभागी होते. मात्र आता या प्रकरणाचे धागेदोरे कराडपर्यंत पोहोचले आहेत.

या खून प्रकरणात कराडच्या धनंजय मारुती वटकर (रा. कराड) (Dhananjay Vatkar) याला पुणे पोलिसांनी ताब्यात घेऊन अटक केली आहे. त्याने हल्लेखोरांना पिस्तूल पुरविल्याचा संशय असून पोलीस त्यादृष्टीने तपास करीत आहेत.

शरद मोहोळची हत्या केल्याच्या प्रकरणात ताब्यात घेतलेल्या आरोपींची चौकशी सुरू असताना पुणे पोलिसांना आणखी काही धागेदोरे मिळाले आहेत. या घटनेत मोहोळ याच्यावर गोळीबार करण्यासाठी पिस्तुल पुरवणारा कऱ्हाडचा वटकर याचा सहभाग असल्याचे समोर आल्याने पुणे पोलिसांनी या आरोपीला ताब्यात घेऊन अटक केली आहे. त्याने हल्लेखोरांना पिस्तूल पुरविल्याचा संशय आहे.

धनंजय वाटकरी पार्श्वभूमी गुन्हेगारी वृत्तीचे राहिली आहे. कराड पोलिसात त्याच्याविरुद्ध यापूर्वी अनेक गुन्हे दाखल आहेत. ओगलेवाडीत मार्च २०२३ मध्ये १४ पिस्तुलांसह १० जणांना अटक केली होती. या गुन्ह्यात वटकरचा सहभाग होता. पोलिसांनी त्यालाही अटक केले होते. त्या गुन्ह्यामध्ये वटकरला जामिन मिळाला होता. जामिनावर असताना त्याने पुण्यातील शरद मोहोळ खुनातील हल्लेखोरांना पिस्तुल पुरविल्याचे प्राथमिक तपासातून समोर आले आहे. मागील काही महिन्यांपासून वटकरचा सातत्याने पुणे परिसरात वावर वाढल्याचे बोलले जात आहे.

कराड शहर व परिसरातील आणखी काही जण पोलिसांच्या रडारवर असल्याची चर्चा आहे. २००९ पासून कराड शहरासह तालुक्यात बेकायदा शस्त्र तस्करी वाढली असल्याचे बोलले जात आहे.

महत्वाच्या बातम्या-

चिंता करू नका ! तुमचा जन्म फौजदार होण्यासाठी झालाय; संघर्षमय कहाणीचा संघर्षयोद्धा पीएसआय रावसाहेब जाधव

माय होम इंडियाकडून राजमाता जिजाऊ गौरव व स्वामी विवेकानंद युवा पुरस्कारार्थी जाहीर

तेजस्विनी पंडित साकारणार ‘स्वराज्य कनिका – जिजाऊ’