माय होम इंडियाकडून राजमाता जिजाऊ गौरव व स्वामी विवेकानंद युवा पुरस्कारार्थी जाहीर

My Home India : राजमाता जिजाऊ यांची ४२५ वी जयंती व स्वामी विवेकानंद यांच्या १६१ व्या जयंतीच्या निमित्ताने स्वामी विवेकानंद प्रतिष्ठान आणि माय होम इंडिया यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमात विविध क्षेत्रात कार्य करणाऱ्या कर्तृत्ववान महिलांना राजमाता जिजाऊ गौरव पुरस्कार तसेच युवकांना स्वामी विवेकानंद युवा पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात येणार आहे. आज या पुरस्कारार्थींची घोषणा करण्यात आली. विविध क्षेत्रातील महिला आणि युवकांचा यावेळी सन्मान करण्यात येणार आहे.

पुण्यातील बालगंधर्व रंगमंदिर येथे १२ जानेवारी २०२४ रोजी सायंकाळी ४ ते ८ या दरम्यान हा कार्यक्रम होणार असून, यावेळी राम मंदिर निर्माण आंदोलनाच्या अग्रणी नायिका दीदी साध्वी ऋतंभरा, स्वामी जितेन्द्रानंद सरस्वती, माढ्याचे खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर, जेएनयुच्या कुलपति शांतिश्री धूलिपुडी पंडित, भाजप महिला मोर्चाच्या प्रदेशाध्यक्षा चित्राताई वाघ, पद्मश्री मिलिंद कांबळे आणि इतर मान्यवर उपस्थित राहणार आहेत. याबाबत सुनील देवधर यांनी माहिती दिली.

राजमाता जिजाऊ गौरव पुरस्काराचे मानकरी : डॉ. सुचित्रा कराड-नांगरे – शैक्षणिक, ममता सपकाळ – सामाजिक, उषा माळी – शैक्षणिक, उषा वाजपेयी – राजकीय, पुष्पाताई वागळे – राजकीय, सीमा चांदेकर – चित्रपट , शुभांगी भालेराव – सामाजिक, अंजली व नंदिनी गायकवाड गायिका – संगीत, शैला नाईक – प्राणीमित्र, डॉ. सुप्रिया पुराणिक – वैद्यकीय, प्रतिभा चंद्रन – पत्रकारिता, गीता पेडणेकर – उद्योग, नंदाताई बराटे – सामाजिक, सी. ए. रचना रानडे – आर्थिक, डॉ. जयश्री तोडकर – वैद्यकीय

विवेकानंद युवा पुरस्काराचे मानकरी : आनंद जाधव, तुषार दामगुडे, सुखदेव अडागळे, शिवशंकर स्वामी, महेश पवळे, किशोर चव्हाण, निलेश भिसे, आशुतोष मुगळीकर, आशुतोष झा, अविनाश तायडे, दत्तात्रेय मिरगणे पाटील

माय होम इंडियाचे संस्थापक सुनील देवधर यांच्या माध्यमातून सामाजिक पातळीवर विविध क्षेत्रात काम केले जात असून, या कार्यक्रमास पुणेकरांनी मोठ्या संख्येने उपस्थित रहावे, असे आवाहन त्यांनी केले आहे.

महत्वाच्या बातम्या-

MLA Disqualification Case Verdict : आम्हाला उध्दव ठाकरे यांच्याबद्दल सहानुभूती आहे – प्रकाश आंबेडकर

MLA Disqualification Case : शिंदे गटाकडून आनंदोत्सव, ठाकरे गटाचे आंदोलन

बाळासाहेबांची शिवसेना उद्धव ठाकरेंनी गमावली; शिंदेंचा गट हीच खरी शिवसेना

उलटतपासणीला न येणं ठाकरेंना पडलं महागात; नार्वेकरांनी दाखवून दिली चूक