आता आपल्यालाही दहशत माजवावी लागेल; मनोज जरांगेच्या ‘त्या’ मागणीनंतर भुजबळ आक्रमक 

Chhagan Bhujbal :  मनोज जरांगेच्या (Manoj Jarange) ओबीसींमध्ये मराठ्यांचा समावेश करावा या  मागणीमुळे ओबीसी (OBC)  समाजात एकच खळबळ उडाली. यातच आता मंत्री छगन भुजबळांनी (Chhagan bhujbal) यांनी सरसकट पहिल्यांदाच मराठा प्रमाणपत्राच्या विरोधात आक्रमक पवित्रा घेतला आहे. बाकीचे समाज आरक्षणासाठी एक झाले तसे ओबीसी समाजाने एकत्र यावे असं आवाहन भुजबळांनी केले आहे. तसेच आपल्यावर अन्याय होत असेल तर आपल्याला दहशत माजावीच लागेल, असे देखील भुजबळ म्हणाले.

छगन भुजबळ म्हणाले,  मराठा आरक्षणाला आमचा विरोध नाही. मराठा समाजाला स्वतंत्र आरक्षण द्या. आरक्षण हा गरिबी हटावचा कार्यक्रम नाही. 70 वर्षाच्या लढ्यानंतर आम्हाला आरक्षण मिळाले आहे. अजूनही  आमचा समाज मागास आहे.   ज्यांची नोंद आढळली असेल त्यांना सर्टिफिकेट देण्यास हरकत नाही.

छगन भुजबळ म्हणाले, आपल्यावर अन्याय होत असेल आणि दुःख झालं असेल तर आपल्याला कोणीही डॉक्टर  औषध देणार नाही. त्यामुळे आपल्याला दहशत माजवावी लागेल.  समोरच्या दरवाज्यातून एन्ट्री मिळत नाही म्हणून तुम्ही मागच्या दरवाजाने येण्याचा हा प्रकार आहे. सर्व ओबीसींनी एकत्रित येऊन उपोषण मोर्चे काढून एक आवाजात उभे राहावे लागेल नाहीतर आपल्या लेकरा बाळांचे भवितव्य धोक्यात येईल.

महत्वाच्या बातम्या-
राष्ट्रवादीचे आमदार एकनाथ खडसे यांना हृदयविकाराचा झटका, शिंदेंनी तात्काळ पाठवली मदत

‘हा’ हर्बल चहा तुम्हाला सर्दी, खोकला आणि विषारी हवेपासून वाचवू शकतो

लाजवाब! विराटने वाढदिवशी झळकावले झंझावाती शतक, तेंडूलकरच्या विक्रमाशी केली बरोबरी