चिंता करू नका ! तुमचा जन्म फौजदार होण्यासाठी झालाय; संघर्षमय कहाणीचा संघर्षयोद्धा पीएसआय रावसाहेब जाधव

Raosaheb Jadhav Real Story| मला तसं लहानपणापासून वर्दीचं प्रचंड आकर्षणं होतं.मी पोलिसाचा चित्रपट बघताना स्वतःला त्या भूमिकेत बघायचो.त्या येडापाई मी साऊथचे कैक मारधाडवाले चित्रपट त्या – त्या भाषेत बघितलेत. भाषेचं काहीच कळत नसलं तरी भावना समजून घेत वर्दीवाल्यांचे चित्रपट बघितलेत. अभ्यास करताना टार्गेट फक्त पीएसआय होतं आणि आज त्याचं बळावर मी पीएसआय झालो,असं सांगत होते पुणे विद्यापीठाच्या जयकर अभ्यासिकेत अभ्यास करून ,प्रसंगी उपाशी राहून पीएसआय पदाला गवसणी घालणारे इंदापुरचे भूमीपुत्र रावसाहेब सुनिता बाळासाहेब जाधव.रावसाहेब यांचा सामान्य रावसाहेब ते फौजदार रावसाहेब हा प्रवास सोपा नाही.एका प्रचंड संघर्षातून उभा राहिलेला हा संघर्ष योद्धा अनेकांसाठी प्रेरणास्थान म्हणून सिद्ध झाला आहे.

जयकर ग्रंथालयामध्ये अभ्यास करणाऱ्या मित्रांनी रावसाहेब जाधव यांचा सत्कार आयोजीत केला होता.त्यावेळी ते बोलतं होते.

ते म्हणाले की, इंदापूरच्या नीरा – नरसिंगपुर जवळच्या टनु या गावाचा.पहिली ते दहावी पर्यंतच माझं शिक्षणं हे गावातच झालं.दहावीला ८६ टक्के मिळाले म्हणुन अकरावीला सायन्स घेतलं.पण मास्तर इंग्रजीत काय बोलतोय ते कळेना.पण तसचं रेटलं बारावी पर्यंत टक्क्याची गाडी थेट ५६ टक्क्यांवर आली.त्याच काळात आयपीएस विश्वास नांगरे – पाटील यांचा खूप प्रभाव माझ्यावर पडला होता.एक वैचारिक मांड आणि भविष्यातील योजना मनात पक्की झाली होती.इंग्रजीतलं सायन्स जमायचं नाही म्हणून इंदापुरला बीएला प्रवेश घेतला.तिकडंही खूप पोषक वातावरण नव्हतं.पण अर्थशास्त्र विषयातून बीए झालों.आता बीए झालो म्हणून एमए करायचं या उद्देशाने पुण्यात आलो.

विद्यापीठांत प्रवेश घेतला.वर्दीचं आकर्षण प्रचंड खुणावत होत.म्हणून झोकून देऊन एमपीएससीचा अभ्यास केला.त्यावेळी पूर्व परीक्षेत दोन मार्कांनी गेलो.अनेकांनी टिंगल – टवाळी केली.त्याकडे अजिबात लक्ष दिलं नाही.जोमाने अभ्यास सुरू ठेवला.पुन्हा दुसऱ्या वेळेला मुख्य परीक्षेत उडालो.शेवटी तिसरा अटेंम्प्ट दिला तो शेवटचा आणि फायनलच.यावेळी अभ्यास एवढा सखोल आणि प्रखर झाला होता की त्यावेळी मुख्य परीक्षेत कायदा या घटकावर ६० पैकी ६० गुण मी घेतले.पीएसआय फॅक्टरी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या रयत प्रबोधिनीच्या मॉक इंटरव्युत मला उमेश कुदळे सरांनी एक रिमार्क दिला होता की  तुमचा जन्म हा फौजदार होण्यासाठी झालाय. बस त्याच बळावर पुढे ग्राउंड इंटरव्युव आणि निकाल लागूनही मराठा आरक्षण ते त्यातून ईडब्लूएस कनवर्जन हा न्यायालयीन प्रवास पूर्ण करू शकलो.

घरची आर्थिक परिस्थिती बेताचीच होती. प्रसंगी केटरींगच्या कामात वाढपी म्हणून गेलो.पण परिस्थिती समोर कधीच झुकलो नाही आणि त्याचीच परिणीती आज आपण बघतायेत,असं ते पुढे म्हणाले.

महत्वाच्या बातम्या-

MLA Disqualification Case Verdict : आम्हाला उध्दव ठाकरे यांच्याबद्दल सहानुभूती आहे – प्रकाश आंबेडकर

MLA Disqualification Case : शिंदे गटाकडून आनंदोत्सव, ठाकरे गटाचे आंदोलन

बाळासाहेबांची शिवसेना उद्धव ठाकरेंनी गमावली; शिंदेंचा गट हीच खरी शिवसेना

उलटतपासणीला न येणं ठाकरेंना पडलं महागात; नार्वेकरांनी दाखवून दिली चूक