शिर्डी – धर्मवीर (Dharmaveer) हा केवळ व्यावसायिक सिनेमा आहे. आनंद दिघे (Anand Dighe) हे फक्त 3-4 लोकांमध्ये कधीच राहिले नाहीत, असं वक्तव्य त्यांचे पुतणे केदार दिघे यांनी केलं आहे.केदार दिघे यांनी शिर्डीच्या साईबाबा मंदिरात (Shirdi Saibaba Temple) दर्शन घेतलं. त्यानंतर माध्यमांशी बोलताना त्यांनी वरील वक्तव्य केलं.
आनंद दिघे यांचे चाहते संपूर्ण महाराष्ट्रात आहेत. अनेकांच्या आयुष्यात दिघेंमुळे आमुलाग्र बदल झाले आहेत. ते 3 तासांच्या सिनेमात बसू शकत नाही. त्यांच्या आयुष्यावर वेब सिरीज बनवावी लागेल, असं केदार दिघे यावेळी म्हणाले. ज्यांनी साहेबांसोबत काम केले त्यांना घेऊन जीवनपट तयार करायला हवा असं सांगत शिवसेना जिल्हाप्रमुख केदार दिघेंनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांच्यावर निशाणा साधला.
पुढे बोलताना केदार दिघे (Kedar Dighe) म्हणाले की, शिवसेना (Shiv Sena) संघटनेत मला जिल्हाप्रमुखपदाची संधी दिली. जी जबाबदारी उद्धव ठाकरेंनी (Uddhav Thackeray) माझ्याकडे दिली. त्यातून लोकांना न्याय देण्याचा, दिवसरात्र सेवा करण्यासाठी मला बळ मिळावं ही माझी प्रार्थना आहे. मी दिघेंचा पुतण्या आहे. बाळासाहेबांचा कडवट शिवसैनिक (Shiv Sainik) आहे. शिवसेनेची सत्ता पुन्हा एकदा यावी. महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रिपदी उद्धव ठाकरे पुन्हा यावेत यासाठी साईबाबांकडे प्रार्थना केली असं त्यांनी म्हटलं.