लोकांची दिशाभूल करू नका; न्यायालयाने रामदेव बाबांना झापलं 

नवी दिल्ली – काही महिन्यांपूर्वी योगगुरू रामदेव बाबा (Yoga Guru Ramdev Baba) यांनी ऍलोपॅथी उपचारांवर (Allopathic Treatment) टीका केली होती.दरम्यान, आता या प्रकरणी उच्च न्यायालयाने (High Courts) यावरून रामदेव बाबा यांना झापलं आहे. अ‍ॅलोपॅथी आणि कोविड-19 च्या उपचारांबाबत योगगुरू बाबा रामदेव यांनी जनतेची दिशाभूल करू नये. तुमचे अनुयायी, शिष्य आणि तुमच्यावर विश्वास ठेवणार्‍या लोकांचे स्वागत आहे. मात्र अधिकृत काहीही कोणाचीही दिशाभूल करू नये, असे उच्च न्यायालयाने म्हटले आहे.

बाबा रामदेव यांनी कोविड -19 च्या (Covid-19) काळात डॉक्टरांनी केलेल्या उपचारपद्धतीवर टीका केली होती. 2021 मध्ये व्हायरल झालेल्या एका व्हिडिओमध्ये कोरोना विषाणूच्या (Corona Virus) संसर्गावर उपचार करण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या काही औषधांवर प्रश्नचिन्ह उपस्थित करत ‘कोविड-19 साठी अॅलोपॅथीची औषधे घेतल्यानंतर लाखो लोकांचा मृत्यू झाल्याचं’, बाबा रामदेव यांनी म्हटलं होतं.

बाबा रामदेव यांच्या या टीकेला डॉक्टरांच्या संघटनांनी कडाडून विरोध केला होता. तर दिल्ली मेडिकल असोसिएशनने (Delhi Medical Association) दिल्ली उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. दिल्ली मेडिकल असोसिएशनच्या याचिकेवर सुनावणी करताना न्यायमूर्ती भंबानी म्हणाले, आयुर्वेदाची प्रतिष्ठा वाचवणे गरजेचं आहे. मात्र अ‍ॅलोपॅथीच्या विरोधात कोणाचीही दिशाभूल होऊ नये हा आमचा उद्देश आहे. मी लस घेणार नाही असे म्हणणे वेगळी गोष्ट आहे, पण लस विसरा असं म्हणणे चूक आहे. त्यामुळे लस घ्या, असही त्यांनी नमूद केलं. सकाळने याबाबत वृत्त दिले आहे.