४० वे अखिल भारतीय ज्योतिष अधिवेशन पुण्यात होणार 

पुणे : भालचंद्र ज्योतिर्विद्यालय आणि प्रा.रमणलाल शहा ज्योतिष अॅकॅडमी आयोजित ४० वे अखिल भारतीय ज्योतिष अधिवेशन पुण्यात २०, २१ ऑगस्ट रोजी होणार आहे. उद्यान प्रसाद मंगल कार्यालय येथे हे अधिवेशन होणार आहे. १८ संस्थांचा या अधिवेशनाच्या आयोजनात सहभाग आहे. अधिवेशनाचे संयोजक नवीनकुमार शहा यांनी पत्रकाद्वारे ही माहिती दिली.

देशभरातून नामवंत ज्योतिर्विद या अधिवेशनात सहभागी होणार आहेत. शनिवारी सकाळी ९ वाजता अधिवेशनाचे उद्घाटन होणार आहे.या अधिवेशनात ज्योतिष विषयक विषयांवर देशभरातील तज्ज्ञांची चर्चासत्र, प्रदर्शन, स्पर्धा आणि मनोरंजनाचे कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहेत. श्री ज्योतिष संशोधन केंद्राच्या संचालक डॉ. ज्योती जोशी यांच्या हस्ते उद्घाटन होणार आहे.आदिनाथ साळवी अध्यक्षस्थानी असणार आहेत. पं.राजेश वशिष्ठ (चंदीगढ ),कैलास केंजळे ( पुणे ), उद्योजक राजकुमार राठोड यांची प्रमुख उपस्थिति असणार आहे.डॉ. प्रसाद जोशी हे स्वागताध्यक्ष आहेत.