‘खरोखरच संपूर्ण मराठा समाज ओबीसीत आला का? खरंच ५४ लाख कुणबी नोंदी मिळाल्या का?’ 

Maratha Reservation : मराठा आरक्षणाच्या (Maratha Reservation) बाबतीत मोठी बातमी समोर येत असून, अखेर मनोज जरांगेंनी ‘मराठा आरक्षणा’ची लढाई जिंकली आहे. सगेसोयरेसह मनोज जरांगे (Manoj Jarange) यांच्या प्रमुख तीनही मागण्या मान्य झाल्या असून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्या हस्ते जूस पिऊन मनोज जरांगे आपलं आमरण उपोषण मागे घेतले आहे.

दरम्यान, या घडामोडींवर आता विविध स्तरातून प्रतिक्रिया येत आहेत. याबाबत मराठा आरक्षणाचे याचिकाकर्ते विनोद पाटील यांची देखील प्रतिक्रिया आली आहे. ते म्हणाले,  मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सगेसोयरे बाबत काढलेल्या जीआरचं मनापासून स्वागत आहे. आमचे सहकारी मनोज जरांगे पाटील यांचे हार्दिक अभिनंदन! समस्त मराठा समाजाच्या एकीमुळे हा ऐतिहासिक निर्णय झाला.

ते म्हणाले, एवढ्यात बातमी पाहिली की ‘मराठ्यांना ओबीसी मध्ये मागच्या दाराने घुसवलं जात आहे,’ असं भुजबळ साहेबांनी वक्तव्य केलं आणि त्यांना आजचा निर्णय मान्य नाही. त्या विरोधात न्यायालयीन लढाई ते लढणार आहेत. माझा भुजबळ (Chhagan Bhujbal) यांना सवाल आहे की, खरोखरच संपूर्ण मराठा समाज ओबीसीत आला आहे का? खरंच ५४ लाख कुणबी नोंदी मिळाल्या का? भुजबळ आपण जबाबदार मंत्री आहात, तुम्हाला देखील खरी हकीकत माहित आहे. तरी देखील विनाकारण तेढ निर्माण करणारे वक्तव्य आपण करत आहात. मराठ्यांना ओबीसीत सामील करून घेण्याचा कुठलाही निर्णय झालेलाच नाही. तुमचे सदरील स्टेटमेंट बिनबुडाचे आहे! आपण राज्याचे मंत्री म्हणून जबाबदारीने वक्तव्य केले पाहिजे.सर्व समाज बांधवांना सांगू इच्छितो, ज्यांच्या नोंदी झालेल्या नाहीत, अशा सर्वांसाठीच शेवटच्या श्वासापर्यंत मी न्यायालयीन लढाई लढणार आहे. क्युरेटीव्ह पिटीशनचा निकाल मराठा समाजाच्या बाजूनेच येईल, हा मला ठाम विश्वास आहे. ज्यांच्या कुणबी नोंदी सापडल्या नाही अशा सर्वांसाठी माझी लढाई सुरू राहील. आई जगदंबा माझ्या लढाईला निश्चितपणे यश देईल. येणारी शिवजयंती आपण मराठा आरक्षणाची शिवजयंती म्हणून साजरी करू, असा शब्द मी तमाम समाज बांधवांना देतो! असं पाटील यांनी म्हटले आहे.

महत्वाच्या बातम्या-

‘वंचित’शी चर्चा करण्याची जबाबदारी नाना पटोले, बाळासाहेब थोरात व अशोक चव्हाण यांच्यावर: रमेश चेन्नीथला

मनोज जरांगे पाटलांचे उपोषण सोडवताना दोन उपमुख्यमंत्री गैरहजर का?

गांजा घेतल्यानंतर मला मजा येते! पहिल्यांदाच व्यसनाबद्दल बोलला अभिनेता नवाजुद्दीन सिद्दीकी