…तेव्हा तुम्ही रांगत होता; कुजकट टोमणा मारणाऱ्या आदित्य ठाकरेंना भाजपचे प्रत्युत्तर 

मुंबई : १ मे रोजी भाजपच्या पोलखोल (Polkhol Sabha) सभेला विरोधीपक्षनेते देवेंद्र फडणवीस (Leader of Opposition Devendra Fadnavis) यांनी संबोधित केलं होतं. या सभेत त्यांनी शिवसेनेला(Shivsena) लक्ष्य केले होते.  ते म्हणाले होते ‘ भोंगे (Loudspeaker) उतरवायला ज्यांची हातभर फाटते, ते म्हणतात आम्ही बाबरी पाडली. काय विनोद आहे ? बाबरी पाडल्याबद्दल ज्या ३२ नेत्यांवर आरोपपत्र दाखल झाले त्यात तुमचा एक महाराष्ट्राचा नेता दाखवा. या आंदोलनात मीही सामील झालो होतो. तेव्हा शिवसेना कुठे होती ? असा सवाल फडणवीस यांनी केला होता. बाबरी पाडली त्यावेळेला आपण तेथे उपस्थित होतो ‘,  असा दावा देखील त्यांनी या सभेत बोलताना केला होता.

यावर  शिवसेनेचे नेते आणि पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे (Environment Minister Aditya Thackeray) यांनी जोरदार प्रत्युत्तर दिले होते. ” १८५७ च्या लढ्यात फडणवीसांचं खूप मोठं योगदान आहे. स्वःतच. असो, पण या गोष्टीत जाण्यापेक्षा आणि वादात जाण्यापेक्षा राम मंदिर (Ram Temple) चांगल होत आहे. कोर्टाने निकाल चांगला दिला. शिवसेनेने संघर्ष केला. चांगल काम होत आहे. आता महाराष्ट्रासमोर बेरोजगारीचा प्रश्न आहे. त्यावर राजकीय पक्षांनी बोलल पाहिजे. चर्चा केली पाहिजे. आम्ही विकासाची कामं करत आहोत”, अशा शब्दांत आदित्य ठाकरे यांनी फडणवीसांवर टीका केली होती .

आदित्य यांनी केलेल्या या टीकेच्या पार्श्वभूमीवर भाजपाचे मुख्य प्रवक्ते केशव उपाध्ये (Keshav upadhye) यांनी फेसबुकवरुन आदित्य ठाकरेंवर निशाणा साधलाय. केशव उपाध्ये यांनी ‘आयत्या पिठावर रेघोट्या’ या मथळ्याखाली लिहिलेल्या फेसबुक पोस्टमधून आदित्य ठाकरेंवर निशाणा साधलाय. “आयत्या पिठावर रेघोट्या ओढत थेट मंत्री बनलेल्या आदित्य ठाकरे यांनी आपल्या पिताश्रींच्या पावलावर पाऊल टाकत राम मंदिरावरून देवेंद्र फडणवीस यांना काहीतरी कुजकट टोमणा मारलाय म्हणे. अहो आदित्यजी, या घटना घडल्या तेव्हा तुम्ही रांगत होता, त्यामुळे तसा तुम्हाला इतिहास (History) माहिती असण्याची शक्यता नाही आणि एकंदरीत ज्या उथळपणे व्यक्त झालात, त्यावरून तुम्हाला या प्रकरणाचं गांभीर्य नाही. हेही स्पष्ट झालंय,” अशी टीका उपाध्ये यांनी या पोस्टमधून केली आहे.

“बाकी राम मंदिरासाठी भाजपानं आपली उत्तर प्रदेशसह (Utter Pradesh) काही राज्यातील सरकारं पणाला लावली. अनेक नेत्यांनी दीर्घकाळ न्यायालयीन लढा दिलाय, हे तुमच्या गावीही नसेल. ज्यांनी राम मंदिराला विरोध केला. अयोध्येतील (Ayodhya) तो वादग्रस्त ढाचा पाडल्यावर विलाप केला, अयोध्येत राम मंदिर होऊच नये म्हणून परिस्थिती निर्माण करण्याचा प्रयत्न केला. श्रीरामांचा अवमान केला, अशा मंडळींशी सत्तेसाठी मांडीला मांडी लावल्यानंतर आता राम आणि राम मंदिरावर बोलण्याचा आपल्याला नैतिक अधिकार किती याचंही जरा आत्मपरीक्षण करा,” असा सल्लाही उपाध्ये यांनी आदित्य ठाकरे याना दिला आहे.