जेष्ठ गायिका प्रभा अत्रे यांचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन, संगीतविश्वावर पसरली शोककळा

Prabha Atre Death:- संगीत क्षेत्राशी संबंधित एक दु:खद बातमी आहे. ज्येष्ठ गायिका प्रभा अत्रे यांचे आज पहाटे निधन झाले. वयाच्या ९२ व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. हृदयविकाराच्या झटक्याने त्यांचे निधन झाले. हृदयविकाराचा झटका आल्यानंतर त्यांना पुण्यातील दीनानाथ मंगेशकर रुग्णालयात नेण्यात आले. मात्र रुग्णालयात पोहोचण्यापूर्वीच त्यांचा मृत्यू झाला. त्यांचा मुंबईत एक कार्यक्रम होता. या कार्यक्रमात सहभागी होण्यापूर्वीच त्यांना हृदयविकाराचा झटका आला.

प्रभा अत्रे यांचा जन्म १३ सप्टेंबर १९३२ रोजी पुण्यात झाला. त्यांना १९९० मध्ये पद्मश्री, २००२ मध्ये पद्मभूषण आणि २०२२ मध्ये पद्मविभूषणने सन्मानित करण्यात आले.

महत्वाच्या बातम्या-

राजेंद्र प्रसाद यांना सोमनाथ मंदिराच्या उद्घाटन समारंभाला जाऊ नका असं का म्हणाले होते नेहरू?

3 पेक्षा जास्त मुले असल्यास महिलांना सरकारी योजनांचा लाभ मिळणार नाही; सरकारचा मोठा निर्णय

राम मंदिराबाबत लालकृष्ण अडवाणींचे महत्त्वाचे विधान, ‘नियतीने ठरवले होते…’