Gautami Patil : कोल्हापुरात गौतमी पाटीलला नो एन्ट्री; सबसे कातीलला सर्वात मोठा धक्का; कारण काय?

Gautami Patil News  : नर्तकी गौतमी पाटीलच्या (Gautami Patil) कोल्हापुरातील प्रस्तावित दोन्ही कार्यक्रमांना कोल्हापूर पोलिसांनी परवानगी नाकारली आहे. गणेशोत्सव सुरक्षेचा ताण पाहता पोलिसांनी परवानगी नाकारली आहे. जेव्हा जेव्हा गौतमीचे राज्यात इतरत्र कार्यक्रम पार पडले आहेत त्या ठिकाणी अतिरिक्त सुरक्षा पोलिसांनी द्यावी लागली आहे. या सर्व पार्श्वभूमीवर गणेशोत्सव काळामध्ये कोल्हापूर जिल्ह्यात होणारे गौतमीचे कार्यक्रम रद्द करण्यात आले आहेत.

कोल्हापूर पोलिसांसह मनोरंजन विभागानेही परवानगी नाकारली आहे. 22 आणि 24 सप्टेंबरला कोल्हापूर जिल्ह्यातील ग्रामीण भागात गौतमी पाटीलचे कार्यक्रम आयोजित करण्यात आले होते. उत्सव काळात कार्यक्रमासाठी आवश्यक पोलीस बंदोबस्त देऊ शकत नसल्याचे पोलीस अधीक्षक महेंद्र पंडित यांनी सांगितले.

सणासुदीच्या काळात गौतमी पाटील हिच्या कार्यक्रमांना मोठी मागणी असते. तिच्या कार्यक्रमाला गर्दी होत असल्याने आयोजक गौतमीला आपल्या तालुक्यात, जिल्ह्यात, गावात बोलावण्यावर भर देत असतात. पण सणासुदीत पोलिसांकडे बंदोबस्तांचं काम असतं. त्यामुळे पोलीस कोणत्याही इतर कार्यक्रमांना उपस्थित राहू शकत नाहीत. त्यामुळे गाण्याच्या आणि स्टेज कार्यक्रमांना पोलीस बंदोबस्त पुरवला जात नाही. गौतमी पाटील हिलाही याच कारणाचा फटका बसला आहे.

महत्त्वाच्या बातम्या-

Virat Kohali : देशभक्त विराट कोहलीने त्याच्या आवडत्या गायकाला इंस्टाग्रामवर अनफॉलो केले, जाणून घ्या नेमके कारण …

Anand Mahindra : आनंद महिंद्रांकडून भारतीय गोलंदाज सिराजसाठी पाठवली ग्रेटभेट

राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये अजूनही फूट नाही! शरद पवार अन् प्रफुल्ल पटेल यांची नवी दिल्लीत भेट

राज ठाकरे जेव्हा मुकेश अंबानी यांच्या घरी पोहोचतात, भेटीमागचं कारण तर आहे अतिशय खास