एसटी महामंडळाकडून फेमस लेडी कंडक्टरवर निलंबनाची कारवाई; जाणून घ्या नेमकं काय आहे कारण ?

उस्मानाबाद – प्रसिद्धी(publicity) मिळवण्याच्या नादात अनेकदा नुकसान होऊन बसते हे वारंवार समोर येत असते. याचाच प्रत्यय आता एक लेडी कंडक्टरला(lady conductor) आला आहे. उस्मानाबाद जिल्ह्यातील मंगल सागर पुरी या लेडी कंडक्टरवर ऑन ड्यूटी(on duty) असता स्वतःचे व्हीडिओ तयार करून सोशल मीडियावर(social media) व्हायरल(viral) केल्याप्रकरणी कारवाई करण्यात आली आहे.एसटी महामंडळाची प्रतिमा मलीन केल्याचा ठपका ठेवत या लेडी कंडक्टर ही कारवाई करण्यात आली आहे.

मंगल सागर पुरी या उस्मानाबाद जिल्ह्यातील कळंब आगारामध्ये लेडी कंडक्टर आहेत. त्या वेगवेगळ्या गाण्यावर व्हीडिओ बनवून सोशल मीडियावर पोस्ट करत असतात. त्यांचे सोशल मीडियावर लाखो फॉलोअर्सदेखील आहेत.दरम्यान एसटी महामंडळाचा ड्रेस घालून तुळजाभवानी देवीच्या गाण्यावरचा मंगल पुरी यांनी एक व्हीडिओ बनवला होता. हा व्हीडिओ त्यांनी सोशल मीडियावर अपलोड(upload) केला होता.