Ind Vs NZ T-20 : भारताने न्यूझीलंडचा 168 धावांनी पराभव केला, मालिकाही 2-1 ने जिंकली

Ind Vs NZ T-20 : टीम इंडियाने बुधवारी (1 फेब्रुवारी 2023) तिसऱ्या T20 मध्ये न्यूझीलंडचा पराभव केला. भारताचा सलामीवीर शुभमन गिल आणि गोलंदाजांनी (हार्दिक पांड्या, शिवम मावी, अर्शदीप सिंग आणि उमरान मलिक) धारदार गोलंदाजीच्या जोरावर किवींचा 168 धावांनी पराभव केला.(Ind Vs NZ T-20 : India beat New Zealand by 168 runs, also won the series 2-1) .

टीम इंडियाचा हा सर्वात मोठा विजय आहे. या विजयासह हार्दिक अँड कंपनीने मालिका 2-1 अशी खिशात घातली. गुजरातमधील अहमदाबाद येथील नरेंद्र मोदी स्टेडियमवर झालेल्या या सामन्यात टीम इंडियाने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी केली. गिलने 63 चेंडूत नाबाद 126 धावा केल्याने भारताने 20 षटकांत 4 गडी गमावून 14 चौकार आणि सात षटकारांसह 234 धावा केल्या, तर न्यूझीलंड संघाला प्रत्युत्तराच्या डावात फक्त 12.1 षटकात 66 धावा काढता आल्या.

आजची खेळपट्टी वेगवान गोलंदाजांसाठी अधिक फायद्याची असल्यानं भारतीय पेसर्सनी तशीच कामगिरी करत अवघ्या 66 धावांत किवी संघाला सर्वबाद केलं. यावेळी सर्वोत्कृष्ट गोलदांजी कॅप्टन हार्दिकनं केली. त्यानं 4 षटकांत 16 धावा देत 4 विकेट्स घेतल्या. याशिवाय अर्शदीप सिंह, उमरान मलिक आणि शिवम मावी यांनी प्रत्येकी 2 विकेट्स घेतल्या. न्यूझीलंडकडून डॅरेल मिचेलनं 35 धावांची झुंज दिली पण ही खेळी पाहुण्या संघाला विजयापर्यंत पोहोचवू शकली नाही.