मोठी बातमी! मॉरिसभाईने आधी ठाकरे गटाच्या नेत्यावर गोळ्या झाडल्या, नंतर …; मुंबई हादरली

Abhishek Ghosalkar  – शिवसेना ठाकरे गटाचे नेते आणि माजी आमदार विनोद घोसाळकर यांचे सुपुत्र आणि माजी नगरसेवक अभिषेक घोसाळकर (Abhishek Ghosalkar Shot in Mumbai) यांच्यावर पैशाच्या वादावरून समोरून पाच गोळ्या झाडल्याची थरारक घटना घडली. दहीसरमध्ये आज संध्याकाळी साडे आठच्या सुमारास ही घटना घडली.

माॅरिस नोरोन्हा(Maurice Noronha) असं गोळीबार करणाऱ्या व्यक्तीचे नाव असून त्याने अभिषेक घोसाळकर यांच्यावर पाच राऊंड फायर केले. यानंतर त्याने स्वत:वर डोक्यात गोळ्या झाडून आत्महत्या केली. उपचारानंतर त्यांचा मृत्यू झाला. यासंदर्भातील वृत्त मुंबई पोलिसांच्या हवाल्याने ANI ने दिलं आहे. आर्थिक वादातून हा गोळीबार झाल्याची माहिती समोर आली आहे.

ठाकरे गटाचे नेते आणि माजी आमदार विनोद घोसाळकर यांचे ते सुपूत्र होत. विनोद घोसाळकर हे २००९ ते २०१४ पर्यंत आमदार होते.ANI ने दिलेल्या वृत्तानुसार मॉरिस नोरोन्हा याने अभिषेक घोसाळकरांवर गोळ्या झाडल्या त्यानंतर त्याने स्वतःवर गोळ्या झाडून आत्महत्या केली.

महत्वाच्या बातम्या : 

Ajit Pawar | ‘आयत्या बिळावर नागोबा’ असणारे हे लोक दुसऱ्याचा पक्ष फोडणारे ‘गद्दार’ आहेत

Supriya Sule | मराठा, धनगर, मुस्लिम आरक्षणाच्या प्रश्नावर संसदेत सुप्रिया सुळे यांनी वेधले लक्ष

Ajit Pawar | पक्षाची भूमिका पुढे वृध्दींगत करण्यासाठी आम्ही कालही कटीबद्ध होतो… आजही आहोत आणि भविष्यातही राहू