प्रताप सरनाईकांकडून तब्बल ७५ तोळं सोनं तुळजाभवानीला अर्पण, कारण विचारल्यानंतर म्हणाले…

तुळजापूर – बाळासाहेबांची  शिवसेना या पक्षाचे आमदार प्रताप सरनाईक यांनी नुकतेच सहकुंटुंब तिर्थक्षेञ तुळजापूरात येवून नवसपुर्ती पोटी पंचाहत्तर तोळे तोळे सुवर्ण हार व सुवर्ण पादुका देवीचरणी अर्पण केली. यावेळी  त्यांची पत्नी ,पुत्र, सुना, नातवंडे तसेच  बाळासाहेबांची शिवसेना युवासेनेचे सरचिटणिस पुर्वेश सरनाईक मुंबई क्रिकेट असोशिऐशन अध्यक्ष विहंग सरनाईक  प्रतीक रोचकरी  उपस्थितीत होते.

श्रीतुळजाभवानी देविच्या पुजेचे पौराहित्य त्यांचे पारंपरिक पुजारी धनंजय गंगणे प्रशांत गंगणे यांनी केले. नवसपूर्ती पोटी बोलताना सरनाईक म्हणाले की श्रीतुळजाभवानी आमची कुलस्वामिनी असल्याने मी प्रत्येक वर्षी देवीदर्नशनार्थ येत असे  मागील तीन वर्षांपूर्वी मुलांनवर तुझा कृपाआशिर्वाद राहु दे व  त्यांचे चांगले होवु दे तुला ५१ तोळ्याचा  सुवर्ण पादुका व  व २१तोळ्याचा सुवर्ण हार घालीन असे साकडे घातले होते. त्यानंतर सर्वकाही चांगले झाले .  नवसपुर्ती पोटी यायचे होते पण  दोनवर्ष कोरोना मुळे येता आले  आम्ही दरवर्षी  नाही आता आलो नवासपूर्ती केली देविचे दर्शन घडले आनंद वाटला.

कोरोना संपताच गुरुवार श्री तुळजाभवानी  मातेचा कुलधर्म कुलाचार करुन देवीचरणी पंचाहत्तर तोळे सोने अर्पण केले. यानंतर मंदीर संस्थान वतीने त्यांचा सत्कार  देविची प्रतिमा देवुन धार्मिक सहाय्यक व्यवस्थापक विश्वास कदम यांनी केला.