‘दृश्यम २’च्या बजेटच्या निम्म्याहून जास्त मानधन आहे एकट्या अजय देवगणचं, घेतलेत इतके कोटी

अभिषेक पाठक दिग्दर्शित ‘दृश्यम २’ हा हिंदी चित्रपट बॉक्स ऑफिसवर धूमाकुळ घालत आहे. शुक्रवारी (१८ नोव्हेंबर) हा चित्रपट चित्रपटगृहात रिलीज झाला असून चाहत्यांकडून या चित्रपटाला भरभरून प्रतिसाद मिळताना दिसतोय. अजय देवगण, तब्बू, श्रिया सरन, अक्षय खन्ना यांच्यासहित अनेक बॉलीवूड सिताऱ्यांनी भरलेल्या या चित्रपटाने ३ दिवसांतच जवळपास ३६ कोटींची कमाई केली आहे. बॉक्स ऑफिसवर हा सिनेमा भरघोस कमाई करत असताना दृश्यम २ (Drishyam 2) मधील कलाकारांनी या चित्रपटासाठी किती मानधन घेतले आहे? याबद्दल जाणून घेऊ.

अजय देवगण
अजय देवगणने ‘दृश्यम २’ चित्रपटात विजय साळगावकर याची भूमिका साकारली आहे. या चित्रपटात तो मुख्य अभिनेता आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, अजय देवगणने या चित्रपटासाठी सर्वाधिक ३० कोटी रुपये घेतले आहेत. हा चित्रपट बनवायला ५० कोटींचा खर्च आला आहे.

तब्बू
तब्बूने ‘दृश्यम २’ चित्रपटात आयजी मीरा देशमुखची भूमिका साकारली आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, तब्बूने या चित्रपटासाठी ३.५ कोटी रुपये घेतले आहेत. अजय देवगण आणि तब्बू यांचा हा एकत्र आठवा चित्रपट आहे.

श्रिया सरन
‘दृश्यम २’ चित्रपटात श्रिया सरनने नंदिनी साळगावकरची भूमिका साकारली आहे. या चित्रपटात ती विजय साळगावकर याची पत्नी आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, श्रिया सरनने या चित्रपटासाठी २ कोटी रुपये फी घेतली आहे.

अक्षय खन्ना
‘दृश्यम २’ चित्रपटात अक्षय खन्नाने तरुणाची भूमिका साकारली आहे. त्याला आयजी मीरा देशमुख मदत करत आहेत. तो चित्रपटाच्या या भागाशी संबंधित आहे. दृश्यम या चित्रपटात तो नव्हता. मीडिया रिपोर्ट्सनुसार, अक्षय खन्नाने या चित्रपटासाठी 2.5 कोटी रुपये घेतले आहेत.

रजत कपूर
‘दृश्यम २’ चित्रपटात रजत कपूरने आयजी मीरा देशमुख यांच्या पतीची भूमिका साकारली आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, रजत कपूरने या चित्रपटासाठी १ कोटी रुपये घेतले आहेत. चित्रपटात आयजी मीरा देशमुख यांच्या मुलाचा खून होतो आणि त्याबाबत तपास सुरू आहे.

इशिता दत्ता
‘दृश्यम २’ चित्रपटात इशिता दत्ताने विजय साळगावकर यांच्या मोठ्या मुलीची अंजूची भूमिका साकारली आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, इशिता दत्ताने या चित्रपटासाठी १.२ कोटी रुपये घेतले आहेत.

मृणाल जाधव
‘दृश्यम २’ या चित्रपटात मृणाल जाधवने विजय साळगावकर यांची धाकटी मुलगी अनुची भूमिका साकारली आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, मृणाल जाधवने या चित्रपटासाठी २० ते ५० लाख रुपये घेतले आहेत.