वरप येथे ७ जानेवारीला राष्ट्रवादी काँग्रेसचा कार्यकर्ता मेळावा; कल्याण तालुक्यात उपमुख्यमंत्री पवारांची तोफ धडाडणार… 

Ajit Pawar In Kalyan –  आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर पक्षबांधणी करण्यासह कार्यकर्त्यांचा उत्साह वाढवण्यासाठी राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी कल्याण तालुक्यात कार्यकर्ता मेळावा आयोजित केला असल्याची माहिती राष्ट्रवादी काँग्रेसचे ठाणे – पालघर जिल्हा समन्वयक आनंद परांजपे यांनी दिली.

राष्ट्रवादी काँग्रेस ठाणे जिल्हा ग्रामीण विभागातर्फे रविवार दिनांक ७ जानेवारी रोजी सकाळी दहा वाजता वरप येथे कार्यकर्ता मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे.

आगामी लोकसभा निवडणुकीच्यादृष्टीने प्रत्येक राजकीय पक्षाने कंबर कसायला सुरुवात केली असून आता महाराष्ट्राच्या राजकारणात झालेल्या राजकीय भूकंपानंतर आणि राज्याच्या उपमुख्यमंत्रीपदाची धुरा खांद्यावर आल्यानंतर कल्याण तालुक्यात अजित पवार पहिल्यांदाच जाणार आहेत. त्यामुळे राजकीयदृष्ट्या त्यांच्या या दौऱ्याला विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे.

कल्याण मुरबाड मार्गावरील वरप गावात हा राष्ट्रवादीचा कार्यकर्ता मेळावा होत आहे. आगामी निवडणुकीची मोर्चेबांधणी आणि ठाणे जिल्ह्यातील ग्रामीण भागात पक्षाची संघटनात्मक ताकद वाढविण्याच्या दृष्टीने हा मेळावा महत्त्वाचा ठरणार आहे.

या मेळाव्याला उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष खासदार सुनिल तटकरे, महिला प्रदेशाध्यक्षा रुपालीताई चाकणकर, प्रदेश उपाध्यक्ष प्रमोद हिंदुराव, राष्ट्रवादीचे युवक प्रदेशाध्यक्ष सूरज चव्हाण, आमदार दौलत दरोडा, युवा नेते पार्थ पवार, कल्याण जिल्हाध्यक्ष जगन्नाथ शिंदे, प्रदेश सरचिटणीस आणि अल्पसंख्याक विभागाचे प्रदेश निरीक्षक नजीब मुल्ला यांच्यासह रमेश हनुमंते, भरत गंगोत्री, सोनिया धामी, किसनराव तारमाळे, प्रवीण खरात आदी प्रदेश पदाधिकारी उपस्थित राहणार आहेत.

महत्वाच्या बातम्या-

‘त्यांच्या विचारांमध्ये रामापेक्षा रावण प्रकर्षानं..’, रामाला मांसाहारी म्हणणाऱ्या आव्हाडांवर भाजपाची टीका

‘राम बहुजनांचे, ते मांसाहारी अन्न खात असत’, जितेंद्र आव्हाड यांचे विधान

अभिषेक बच्चनसोबत घटस्फोटाच्या चर्चेदरम्यान ऐश्वर्या राय पोहोचली बागेश्वर बाबांच्या दरबारात