महादेव अॅपच्या मालकाविरोधात ईडीच्या तपासात मोठा खुलासा; दाऊद कनेक्शनही आले समोर

Dawood Ibrahim: ईडी महादेव बेटिंग अॅपची चौकशी करत आहे, जे बेकायदेशीर बेटिंग वेबसाइटसाठी नवीन वापरकर्त्यांची व्यवस्था करते. या अॅपचा मालक सौरभ चंद्राकरला गँगस्टर लॉरेन्स बिश्नोईने खंडणी मागण्यासाठी धमकावल्याचेही तपासात समोर आले आहे.

सूत्रांच्या माहितीनुसार, महादेव अॅपचा मालक चंद्राकर याचे अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमशी संबंध असल्याचे ईडीच्या तपासात समोर आले आहे. दाऊद इब्राहिमने स्वत: महादेव अॅपचे मालक चंद्रकरला संरक्षण दिले.विशेष म्हणजे १५ सप्टेंबर रोजी ईडीने माहिती दिली. सौरभ चंद्राकरचा साथीदार रवी उप्पल याच्यावरही ईडी कारवाई करत आहे. एजन्सी या दोघांविरुद्ध 5 हजार कोटी रुपयांच्या मनी लॉन्ड्रिंग प्रकरणाचा तपास करत आहे.

त्याचवेळी दुबईत सौरभ चंद्राकरच्या पार्टीत प्रसिद्ध बॉलिवूड स्टार्स आणि अंडरवर्ल्डमधील लोक सहभागी झाल्याचा संशय आहे. सौरभ चंद्राकर यांनी त्यांच्या लग्नात 200 कोटी रुपये रोख खर्च केले होते आणि त्याचा संपूर्ण काळा व्यवसाय 20 हजार कोटी रुपयांचा आहे असे सांगितले जात आहे.

महादेव अॅप दुबईहून ऑपरेट केले जाते. या वर्षी फेब्रुवारीमध्ये सौरभचे दुबईमध्ये भव्य लग्न झाले होते, ज्यामध्ये 200 कोटी रुपये खर्च करण्यात आले होते. या लग्नसोहळ्याला अनेक बॉलिवूड सेलिब्रिटींनी हजेरी लावली आणि ज्यांनी येथे परफॉर्म केले त्यांना मोठ्या प्रमाणात पैसेही देण्यात आले.

महत्त्वाच्या बातम्या-
Video : मोहम्मद सिराज नव्हे, तर रोहित शर्माने आशिया चषक दुसऱ्याच खेळाडूकडे सोपवला
फायनलमध्ये अशी कामगिरी करणे तुमची मानसिक ताकद दर्शवते; कर्णधार रोहितचा आनंद गगनात मावेना
अभिनेत्री Zareen Khan विरोधात अटक वॉरंट; जाणून घ्या नेमके काय आहे प्रकरण