फायनलमध्ये अशी कामगिरी करणे तुमची मानसिक ताकद दर्शवते; कर्णधार रोहितचा आनंद गगनात मावेना

Asia Cup Final: भारत विरुद्ध श्रीलंका (India vs Sri Lanka) संघात आज कोलंबोच्या मैदानावर आशिया चषकाचा अंतिम सामना पार पडला. या सामन्यात श्रीलंकेला लाजिरवाण्या पराभवाला सामोरे जावे लागेल. श्रीलंकेचा संघ अवघ्या ५० धावांवर बाद झाल्याने भारताला सोपे लक्ष्य मिळाले. भारताच्या सलामी जोडीने ७ षटकातच लक्ष्य गाठत आशिया चषक जिंकला. आशिया चषकावर आपले नाव कोरण्याची ही भारताची आठवी वेळ आहे. या विजयानंतर भारताचा कर्णधार रोहित शर्माला (Rohit Sharma) आनंद गगनात मावेनासा झाला.

‘ही खूप ग्रेट कामगिरी होती. फायनलमध्ये अशा प्रकारे कामगिरी करणे हे तुमची मानसिक ताकद दर्शवते. आम्ही चांगली गोलंदाजी करत सुरूवात केली आणि फलंदाजीतही दमदार कामगिरी करत सामना संपवला. मी स्लिपमध्ये उभा राहून पाहत होतो की आमचे वेगवान गोलंदाज किती कष्ट करत होते. त्यांचे विचार एकदम स्पष्ट होते. अशी कामगिरी खूप दीर्घकाळ लक्षात राहते. या सामन्यात अशी कामगिरी होईल याचा विचार आम्ही केला नव्हता.’ अशा शब्दांत रोहितने फलंदाज आणि गोलंदाजांचे कौतुक केले.

रोहित पुढे म्हणाला की, ‘वैयक्तिक कामगिरीबद्दल बोलायचं झालं तर सिराजला सर्व श्रेय द्यावं लागेल. एखादा वेगवान गोलंदाज हवेतही स्विंग करतो आणि ऑफ द पिच देखील स्विंग करण्याची क्षमता ठेवतो हे दुर्मिळ असतं. तो चांगलाच परिपरक्व होत आहे.’

‘आम्ही या स्पर्धेत एक संघ म्हणून जे काही साध्य करण्यासाठी आलो होतो ते सर्व साध्य केलं आहे. आता आम्ही भारतातील मालिकेचा आणि वर्ल्डकपचा विचार करत आहोत. ज्या प्रकारे हार्दिक आणि इशान किशनने पाकिस्तान विरूद्धच्या सामन्यात दबावात फलंदाजी केली.’ असे त्याने म्हटले.

https://youtu.be/TX3th3G8Jxw?si=h95znRKD99Z0jYXs

महत्त्वाच्या बातम्या-

Dhanashree Verma: माझी ताजमहल…; धनश्री वर्माच्या बोल्ड लूकवर युझवेंद्र चहल फिदा

मराठा समाजाला आरक्षण देताना ओबीसींचे आरक्षण शून्य टक्केही कमी होणार नाही- बावनकुळे

‘श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपती ट्रस्ट’कडून गणेशोत्सवात कार्यक्रमांची रेलचेल