राज्य सरकार तरुणांच्या स्वप्नांशी खेळत आहे, जीआर रद्द करा अन्यथा…; राष्ट्रवादीचा इशारा

Mehboob Shaikh- राज्य सरकार राज्यातील तरुण-तरुणींचे सरकारी नोकरीचे स्वप्न भंगोले आहे. राज्य सरकार आता कंत्राटी पद्धतीवर अनेक विभागातील पदे भरणार आहे. या संदर्भातील शासनाने काढलेले परिपत्रकाची होळी राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या वतीने प्रदेश कार्यालयासमोर करण्यात आली. युवक प्रदेशाध्यक्ष महबूब शेख यांच्या नेतृत्वात होळी करण्यात आली यावेळी मोठ्या संख्येने राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे कार्यकर्ते पदाधिकारी उपस्थित होते.

यावेळी राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष महबूब शेख म्हणाले की, सरकारने जो कंत्राट जीआर काढला आहे. तो तरूणांचे रोजगार धोक्यात घालणारा आहे. तरुण पिढीच्या भविष्यासोबत राज्य सरकार खेळत आहे. त्यामुळे या जीआरची आज राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या वतीने होळी करण्यात आली आहे. राज्य सरकारने हा जीआर तातडीने रद्द करावा अन्यथा राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने रस्त्यावर आंदोलन करण्यात येईल असा इशारा देखील यावेळी देण्यात आला आहे.

पुढे महेबुब शेख म्हणाले की, हे कंत्राट कुणासाठी काढले आहे. क्रिस्टल कंपनी कुणाची आहे. कोणाला लाडाने प्रसाद दिला आहे. भाजपच्या लोकांच्या हातात तुम्ही तरूणाचे भविष्य देत आहात. याचा आम्ही निषेध करतो. हा जीआर ६ स्ंप्टेबर २०२३ ला काढला आहे. या दिवशी गद्दार लोकांचे सरकार होते. त्यांनी हा जीआर रद्द करावा. भाजपने सत्तेत आल्यानंतर मोठ्या प्रमाणात रोजगार उपलब्ध करून देणार, सरकारी नोकऱ्या उपलब्ध करून देणार ,असे म्हटले होते. मात्र सरकार रोजगार आणि सरकारी नोकऱ्या उपलब्ध करून देण्यापेक्षा आता कंत्राटी पद्धतीवर नोकऱ्या देत आहे. सरकारी नोकरीचे स्वप्न पाहणाऱ्या सामान्य तरुणाचे स्वप्न राज्य सरकारने पायाखाली तुडवले आहे. हे सरकार शेतकरी आणि सर्वसामान्यांचे सरकार नाही आहे. केवळ उद्योगपतीं आणि कंत्राटकदाराचे स्वप्न पूर्ण करणारे सरकार आहे. असा घनाघात देखील महबूब शेख यांनी यावेळी बोलताना केला आहे.

महाविकास आघाडी सरकार असताना शेतकरी आणि सर्वसामान्यांसाठी अनेक योजना राबवल्या होत्या. हे भाजप नेत्यांना खुपल्यामुळे त्यांनी राज्यातील सर्वसामान्यांची सरकार असलेले महाविकास आघाडी सरकार पाडली. जर हा जीआर महाविकास आघाडीच्या कार्यकाळात निघाला असता तर भाजपने मोठे रान पेटवले असते. मात्र आता भाजप नेते गप्प आहे. भाजपची नीती सर्वसामान्य जनतेसाठी नसून उद्योगपती आणि कंत्राटदार यांना मोठी करण्या ची आहे. असे देखील यावेळी महबूब शेख म्हणाले.

महाविकास आघाडी सरकार असताना जे सर्वसामान्य जनतेसाठी हिताचे निर्णय घेतले होते. ते सर्व तुम्ही गेल्या सरकारचे सगळे जीआर रद्द करता. मग तुम्ही हाच जीआर तेवढा का पाळता धुळेकर करत आहे. युवकाचा अंत पाहू नका आगामी निवडणुकीमध्ये युवक तुम्हाला धडा शिकवल्याशिवाय राहणार नाही . ज्याप्रमाणे तुम्ही युवकांचे स्वप्न भंग केले त्या प्रकारे तुमचे सत्तेचे स्वप्न युवक भंग करेल असे देखील महबूब शेख यांनी म्हटले आहे.

मेहबूब शेख म्हटले की ,माझे म्हणणे आहे. की ,अजीत दादा असे म्हणत असतील तर माजी आमदार यांचे पगार बंद करा. अशा कंत्राटी नोकऱ्या लागल्या तर त्यांची लग्न होणार नाही. परमनंट नोकऱ्या द्या. तुम्हाला युवकांचे हीत लक्षात घ्यायच असेल तर हा जीआर रद्द करा लागेल अन्यथा राष्ट्रवादी युवक काँग्रेस राज्यभर राज्य सरकार विरोधात मोठ्या प्रमाणात आंदोलन करेल या सर्वाला राज्य सरकार जबाबदार असेल असे देखील यावेळी महबूब शेख यांनी म्हटले आहे.

हे आंदोलन राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष महबूब शेख यांच्या नेतृत्वात करण्यात आले. यावेळी पनवेल राष्ट्रवादी काँग्रेस चे जिल्हाध्यक्ष प्रमोद बागल ,नवी मुंबई युवक अध्यक्ष अन्नू आंग्रे, प्रदेश उपाध्यक्ष अमोल मातेले, प्रदेश सचिटणीस उमेश अगरवाल, प्रदेश सचिव गुरुज्योत सिंग किर, पनवेल युवक अध्यक्ष शाहबाझ पटेल, प्रदेश सरचिटणीस नाजेर शेख, आदित्य जनोरकर यांच्यासह युवक काँग्रेसचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

महत्त्वाच्या बातम्या-
Video : मोहम्मद सिराज नव्हे, तर रोहित शर्माने आशिया चषक दुसऱ्याच खेळाडूकडे सोपवला
फायनलमध्ये अशी कामगिरी करणे तुमची मानसिक ताकद दर्शवते; कर्णधार रोहितचा आनंद गगनात मावेना
अभिनेत्री Zareen Khan विरोधात अटक वॉरंट; जाणून घ्या नेमके काय आहे प्रकरण