अडचणी वाढल्या; नवाब मलिक यांना 3 मार्चपर्यंत ईडी कोठडी : PMLA कोर्ट

मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसचे (NCP) नेते अल्पसंख्यांक मंत्री नवाब मलिक (Nawab Malik) यांना ईडीकडून अटक करण्यात आली आहे.अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमशी संबंधित मनी लाँड्रिंग प्रकरणी ईडीने नवाब मलिक यांना अटक केली आहे.

नवाब मलिक यांची सकाळपासून चौकशी करण्यात आली होती. ईडीनं नवाब मलिक यांची आठ तास चौकशी केल्यानंतर अटकेची कारवाई करण्यात आली आहे. दरम्यान, ईडीनं विशेष पीएमएलए कोर्टात (PMLA Court) 14 दिवसांच्या कोठडीची मागणी केली होती मात्र न्यायालयाने ३ मार्च म्हणजेच 8 दिवसांची ED कोठडी सुनावण्यात आली आहे. जवळपास अडीच तासापेक्षा अधिक वेळ दोन्ही बाजूने युक्तीवाद पार पडल्यानंतर कोर्टाने नवाब मलिक यांना 8 दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. दरम्यान, मलिक यांना घरचं जेवण घेण्याची परवागनी देण्यात आली आहे.

दरम्यान, नवाब मलिक यांच्या समर्थनार्थ महाविकास आघाडी सरकारचे मंत्री आंदोलन करणार आहेत. महाविकास आघाडी सरकार नवाब मलिक यांच्या पाठिशी राहणार असून उद्या सकाळी महात्मा गांधी यांच्या पुतळ्यासमोर आंदोलन करण्यात येणार आहे.