Eknath Khadse | भाजपमध्ये जाण्याच्या चर्चांवर एकनाथ खडसे यांचे सूचक वक्तव्य, म्हणाले,…

राष्ट्रवादीच्या शरद पवार गटाचे जेष्ठ नेते एकनाथ खडसे (Eknath Khadse) हे पुन्हा भाजपमध्ये घरवापसी करणार असल्याच्या चर्चा सध्या सुरु आहेत. खडसे हे दिल्लीत गेल्यानंतर ते भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याचे चर्चांना वेग आला होता. मात्र एकनाथ खडसे दिल्लीहून परतल्यानंतर त्यांनी पहिल्यांदाच प्रतिक्रिया देत त्यांनी आपली भूमिका स्पष्ट केली आहे.

पक्षांतर करण्याचा निर्णय कार्यकर्त्यांना विश्वासात घेऊन घेणार असल्याचे म्हणत तुर्तास असा निर्णय मी घेणार नाही, भाजपमध्ये जाण्याच्या चर्चांवर बोलताना एकनाथ खडसे यांनी हे स्पष्टीकरण दिलंय. एकनाथ खडसे पुढे असेही म्हणाले, असा काही निर्णय एका दिवसात एका क्षणात किंवा दिवसात होत नसतो. त्यासाठी कार्यकर्त्यांना विश्वासात घेऊनच असे निर्णय होत असतात असे त्यांनी वक्तव्य केले.

ज्या पक्षाने आपल्याला मदत केली तर पक्षाला विश्वासात घ्यायला पाहिजे. त्यामुळे अशी कुठलीही प्रक्रिया मी आतापर्यंत केलेली नाही. त्यामुळे आता या सर्व प्रश्नांना मला पूर्णविराम द्यावासा वाटतो. जेव्हा काही अशासंदर्भात विषय येईल तेव्हा मी स्वतःहून सांगेल असे एकनाथ खडसे (Eknath Khadse) यांनी म्हटले.

आपल्या भागातील बातम्या जाणून घेण्यासाठी जॉइन करा आझाद मराठीचा’चा व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप

महत्वाच्या बातम्या :

Narayan Rane | पुण्याची खासदारांची विशेष परंपरा मुरलीधर मोहोळ जोपासणार

Uddhav Thackeray | मुंबईतल्या २ जागा मित्रपक्षाला दिल्यात, ते लढणार नसतील तर आम्ही लढू

Vasant More | “२५ वर्ष ज्या पक्षात एकनिष्ठ राहिलो, तिथे न्याय मिळाला नाही”; वसंत मोरेंनी बोलून दाखवली खंत