राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांच्या उपस्थितीत लोकसभा मतदार संघाचा आढावा

Sharad Pawar:- आगामी लोकसभा निवडणुकीच्या (Loksabha Election 2024) पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने आज उर्वरित १० लोकसभा मतदारसंघनिहाय आढावा बैठक घेण्यात आली आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांच्या प्रमुख उपस्थितीत लोकसभा मतदारसंघनिहाय आढावा बैठक आयोजित करण्यात आली होती. शरद पवार साहेबांनी प्रत्येक मतदारसंघनिहाय स्थानिक नेते आणि प्रमुख पदाधिकारी यांच्याशी चर्चा केली.

राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांच्या उपस्थितीत आज मुंबई ईशान्य, भिवंडी, दिंडोरी, माढा, कोल्हापूर, अहमदनगर, सातारा, बीड, हिंगोली आणि जळगाव रावेर या लोकसभा मतदारसंघनिहाय आढावा घेण्यात आला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रदेश कार्यालयात दुपारी १२ वाजल्यापासून या आढावा बैठकीला सुरुवात करण्यात आली होती.

राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांच्या उपस्थितीत ऑक्टोबर महिन्यामध्ये १८ ते १९ या दोन दिवसांमध्ये १५ लोकसभा मतदारसंघाचा आढावा घेण्यात आला होता. त्यामध्ये अहमदनगर, हिंगोली, वर्धा, अमरावती, बीड, भिवंडी, चिपळूण, शाहापूर आणि जालना, कोल्हापूर, जळगाव, पुणे, सातारा, सोलापूर या मतदारसंघाचा आढावा घेण्यात आला होता.

याप्रसंगी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष तथा आमदार जयंत पाटील, राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते तथा खासदार श्रीनिवास पाटील, पक्षाचे राष्ट्रीय महासचिव तथा आमदार जितेंद्र आव्हाड, माजी मंत्री तथा आमदार राजेश टोपे, माजी मंत्री आमदार बाळासाहेब पाटील, माजी मंत्री आमदार प्राजक्त तनपुरे, आमदार एकनाथ खडसे, आमदार शशिकांत शिंदे, आमदार संदीप क्षीरसागर, माजी आमदार तथा कोषाध्यक्ष हेमंत टकले, प्रदेश सरचिटणीस रवींद्र पवार, महिला प्रदेशाध्यक्षा रोहिणी खडसे, मुंबई विभाग अध्यक्षा राखी जाधव, प्रदेश सरचिटणीस अदितीताई नलावडे, युवक प्रदेशाध्यक्ष महेबुब शेख इतर मान्यवर व प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते.

महत्वाच्या बातम्या-

महामानवांच्या विचारावर आमच्या पक्षाची वाटचाल सुरू असून आमचे व्हिजन क्लीअर आहे – अजित पवार

‘धर्माच्या नावावर द्वेष वाढविला जात आहे, संघाच्या शाखेपासून सोशल मीडियापर्यंत जाणीवपूर्वक या गोष्टी होत आहेत’

Lahu Balwadkar | लहू बालवडकरांच्या वाढदिवसानिमित्त पार पडला ‘चैतन्यस्पर्श’ अभूतपूर्व सोहळा

“येत्या निवडणुकीत तिप्पट नगरसेवक असतील अशी ताकद समीरभाऊ तुमच्या नेतृत्वाखाली पक्षात उभी राहिली आहे”