अजित पवार यांनी आपल्या मुलाला समजावलं पाहिजे; खडसेंनी थेट अजितदादांना फटकारले

Parth Pawar – राज्याचे उपमुख्यमंत्री आणि पुण्याचे पालकमंत्री असलेल्या अजित पवारांचे चिरंजीव (Ajit Pawar Son) पार्थ पवार यांनी मोक्का, खून,खंडणी, अपहरण यासारख्या गंभीर गुन्ह्यातील आरोपी आणि मारणे टोळीचा म्होरक्या असलेल्या गजा मारणेची (Gajanan Marne) घरी जाऊन भेट घेतली. या भेटीमुळे ते सध्या राजकीय टीकेचे धनी बनले आहेत.

बुधवारी संध्याकाळी पार्थ पवार हे गजानन मारणे याच्या घरी गेले होते. गजा मारणे हा पुण्यातल्या कुख्यात मारणे टोळीचा म्होरक्या आहे. गजा मारणे याच्यावर सहापेक्षा जास्त खुनाचे गुन्हे आहेत. 2 वेळा गजा मारणेवर मोक्का अंतर्गत कारवाई करण्यात आली आहे.

दरम्यान, या मुद्द्यावरून राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे (Eknath Khadse) यांनी अजित पवारांना लक्ष्य केलं आहे. अजित पवार पुण्याच्या कायदा व सुव्यवस्थेवर भाष्य करतात आणि दुसरीकडे ज्या पुणे शहरात गजानन मारणे याच्यावर खून, दरोडा अशा वेगवेगळ्या पद्धतीचे सहा गुन्हे दाखल आहेत. त्याच गजानन मारणे याला अजित पवार यांचा मुलगा भेटत असेल तर ते योग्य नाही, अशी टीका खडसे यांनी केली.

जर अजित पवार हे कायदा व सुव्यवस्थेच्या समर्थन करत असतील तर किमान अजित पवार यांनी आपल्या मुलाला तरी समजावलं पाहिजे. या शब्दात आमदार एकनाथ खडसे यांनी अजित पवार यांना जोरदार टोला लगावला आहे.

महत्त्वाच्या बातम्या –

मनोज जरांगे पाटील मनुवादी, मनुवादी लोकांना आरक्षण देऊ नये; लक्ष्मण माने यांचे वक्तव्य

राज्यातील विमानतळांचा कालबद्धरित्या विकास करावा – उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

‘काहीही झालं तरी झुकणार नाही’, ईडीकडून ११ तास चौकशीनंतर रोहित पवारांची प्रतिक्रिया