Adhalarao Patil | आव्हाळवाडी गावातील सर्व प्रश्न मार्गी लावण्यासाठी मोदींच्या विचाराचा खासदार निवडून द्या

Adhalarao Patil | राज्यात लोकसभेच्या तिसऱ्या टप्यातील मतदान काल पार पडले. आता चौथ्या टप्यातील मतदारसंघात उमेदवारांचा जोरदार प्रचार सुरू आहे. महायुतीचे शिरुर लोकसभेचे (Shirur LokSabha) अधिकृत उमेदवार शिवाजीराव आढळराव पाटील (Shivajirao Adhalarao Patil) यांच्या प्रचारार्थ हवेली तालुक्यातील आव्हाळवाडी येथे गावभेट दौऱ्याचे आयोजन करण्यात आले. यावेळी विठ्ठल मंदिरात दर्शन घेऊन गावभेटीस सुरवात करण्यात आली. दरम्यान, परिसरातील नागरिकांनी मोठ्या जल्लोषात आढळराव पाटील यांचे जंगी स्वागत केले.

यावेळी बोलताना शिवाजीराव आढळराव पाटील म्हणाले, ” आव्हाळवाडी गावाने मला भरभरून दिले आहे. गावाशी माझे जुने ऋणानूबंध आहेत. गावाच्या विकासासाठी व मतदार संघात राहिलेली कामे पुर्ण करण्यासाठी शिंदे साहेब, अजित दादा, देवेंद्रजी यांच्या माध्यमातून मोठा निधी आणायचा आहे. केंद्रात आपले म्हणजे मोदीजी यांचे सरकार येणार आहे. आपल्या सर्व योजना आपण पुर्ण करु, परंतू त्यासाठी मोदीजी यांच्या विचाराचा खासदार आपल्याला निवडून आणावा लागेल. मला केलेले मतदान म्हणजे मोदीजी यांना केलेले मतदान होय. सर्व प्रश्न मार्गी लावण्यासाठीये मोदीजी यांच्या विचाराचा खासदार निवडून द्या. येणाऱ्या 13 तारखेला आपण जागृत राहून मला घड्याळाला जास्तीत-जास्त मतदान करावे हीच विनंती करतो.

यावेळी महायुतीचे शिरुर लोकसभेचे अधिकृत उमेदवार शिवाजीराव आढळराव पाटील, सरपंच नितीन घोलप, माजी उपसरपंच विलास बबन आव्हाळे, युवा मोर्चा उपाध्यक्ष गणेश बापू कुटे, सोमनाथ आव्हाळे, शरद आव्हाळे, नितीन आव्हाळे यांच्यासह महायुतीमधील घटक पक्षांचे पदाधिकारी यावेळी उपस्थित होते.

आपल्या भागातील बातम्या जाणून घेण्यासाठी जॉइन करा आझाद मराठीचा’चा व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप

महत्वाच्या बातम्या :

Muralidhar Mohol | झोपडीधारकांना मिळणार हक्काचे घर

Devendra Fadnavis | आढळरावांसारखा नेता मोदींसोबत केंद्रात जाईल, तेव्हा या भागाचा मोठ्या प्रमाणात विकास होईल

Shirur LokSabha | कोल्हे कवडीचं काम करत नसेल तर जनता त्यांना कवडीमोल करेल, दरेकरांनी साधला निशाणा