‘काहीही झालं तरी झुकणार नाही’, ईडीकडून ११ तास चौकशीनंतर रोहित पवारांची प्रतिक्रिया

Rohit Pawar:- राष्ट्रवादी काँग्रेस मधील कार्यकर्ता अडचणीत येतो तेव्हा बापमाणूस त्याच्यासोबत असतो. राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांना (Sharad Pawar) लढणारी माणसं आवडतात. पळणाऱ्यांच्या नाही तर लढणाऱ्यांच्या मागे शरद पवार उभे असतात असे राष्ट्रवादी काँग्रेसचे युवा नेते तथा आमदार रोहित पवार यांनी ईडी चौकशी संपल्यानंतर कार्यकर्त्यांशी राष्ट्रवादी काँग्रेस प्रदेश कार्यालयामध्ये संवाद साधताना म्हटले आहे.

रोहित पवार म्हणाले की, हा मार्ग संघर्षाचा आहे. आपल्या विचारांचा वारसा जपण्यासाठी संघर्षाची भूमिकाची तयारी सर्वांना ठेवावी लागेल. स्वाभिमानी नागरिकांना एकच विनंती मराठी माणसासाठी आम्ही सर्वांनी ठरवलं की लढायचं त्यांच्यासाठी अधिकारी जे काही फाईल मागत आहेत त्याचं सहकार्य आपण करत आहोत, १२ तासांच्या चौकशीनंतर येत्या १ तारखेला मला पुन्हा बोलावलं आहे. जी माहिती मागितली ती माहिती मी दिलेली असल्याचं रोहित पवार यांनी सांगितले आहे.

रोहित पवार म्हणाले की, तुम्ही सर्व लोक आदरणीय पवार साहेबांच्या प्रेमापोटी या ठिकाणी आला आहात. त्याबद्दल तुम्हा सर्वांचे आभार व्यक्त करतो. आपण ८४ वर्षाच्या युवाबरोबर सर्वजण आहोत, आपण सर्वजण येथे आलात. न बोलावता तुम्ही इथपर्यंत आला त्याबद्दल मी तुमचे आभार मानतो. गर्दी करा असं आपण कुणाला सांगितलेलं नव्हतं. तुम्ही प्रमाने सकाळपासून इथं थांबलेला आहात. जे अधिकाऱ्यांनी विचारलं ते त्यांना सांगितलेलं आहे. आतमध्ये मी सहकार्य करत होतो. अनेक लोकं थकतात, घाबरतात, अनेकांना कळत नाही काय करायचं. पण मी जेव्हा तिथं बसलो तेव्हा तुमच्या सगळ्यांचा आवाज माझ्या कानापर्यंत पोहोचत होता. तुम्ही प्रेमापोटी घोषणा देत होतात, लढत होतात. यातून मला प्रेरणा मिळत होती असे रोहित पवार म्हणाले.

रोहित पवार म्हणाले की, जेव्हा एखादा कार्यकर्ता अडचणीत येतो, तेव्हा पवार खंबीरपणे मागे उभे राहतात. याच्यावरुन एक गोष्ट लक्षात घ्या की पवार साहेब संधी देतातही आणि अडचणीत आलेल्यांना बाप माणूस म्हणून मागे उभे रहतात. पळणाऱ्यांच्या पाठीमागे साहेब थांबत नाहीत पण लढणाऱ्यांच्या पाठीमागे खंबीरपणे उभे राहतात. हा वारसा विचारांचा आणि स्वाभिमानाचा आहे. आपल्या सगळ्यांची संघर्षाची तयारी असली पाहिजे असेही रोहित पवार म्हटले.

रोहित पवार म्हणाले की, मी आपल्या सर्वांच्या साक्षीने सांगतो की, मी राजकारणात येण्याआधी व्यवसायात होतो. पण काही लोक राजकारणात आधी येतात मग व्यवसाय करायला लागतात. त्यामुळे मला चौकशीत जे-जे काही मागितले जाईल, विचारले जाईल ते मी अधिकाऱ्यांना देणार आहे. त्यांना सहकार्य करत राहणार आहे. तर ही लढाई सुरूच राहणार आहे. येत्या १ फेब्रुवारीला मला पुन्हा परत बोलावले आहे. अतिरिक्त माहिती मागितली आहे. त्यासाठी मी पुन्हा सक्रिय राहणार आहे.

पुढे रोहित पवार म्हणाले की, मला कुणासमोर वाकायला आवडत नाही, पण महाराष्ट्राच्या स्वाभीमानी जनतेसमोर झुकायला काही हरकत नाही. काही झाल तरी त्यांच्यासमोर वाकणार नाही. बापमाणूस माझ्या मागे उभा आहे. पवार साहेब पळणाऱ्यांच्या मागे नाही, लढणाऱ्यांच्या मागे राहतात असे रोहित पवार म्हणाले.

महत्वाच्या बातम्या-

मनोज जरांगे पाटील मनुवादी, मनुवादी लोकांना आरक्षण देऊ नये; लक्ष्मण माने यांचे वक्तव्य

मनोज जरांगे पाटील यांचे रिपब्लिकन पक्षाच्या वतीने भव्य स्वागत

शरद पवारांच्या छत्रछायेखाली मोठे झालात आणि आज उलट्या तांगड्या करताय, मानेंची टीका