एकनाथ शिंदे हे बाळासाहेबांचे राष्ट्रीय उत्तराधिकारी, रामदेव बाबांनी केले मुख्यमंत्र्यांचे कौतुक 

मुंबई –   मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) हे हिंदु धर्माचे गौरव पुरूष आहेत. तेच खरे बाळासाहेब ठाकरे यांचे राष्ट्रीय उत्तराधिकारी आहेत, असं वक्तव्य योग गुरु रामदेव बाबा यांनी केलंय. रामदेव बाबा (Ramdev Baba) यांनी आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतली. शिंदेंच्या नंदनवन या निवासस्थानी रामदेव बाबांनी भेट घेतली.  यानंतर बोलताना बाबांनी ही स्तुतिसुमने उधळली.

काय म्हणाले रामदेव बाबा?

मुख्यमंत्री आमच्या हिंदु धर्माचे, सनातन धर्माचे गौरव पुरुष आहेत. राजधर्मसोबतच ते सनातन, ऋषीधर्मालाही प्रामाणिकपणे निभावत आहेत. त्यांना शुभेच्छा देण्यासाठी मी आलो आहे. बाळासाहेब ठाकरे यांच्याशी आमची आत्मीयता आहे. त्यांचे मानस, आध्यात्मिक आणि राष्ट्रीय उत्तराधिकारी म्हणून आम्ही त्यांच्याकडे पाहत आहोत, असं वक्तव्य रामदेव बाबा यांनी केलंय.TV9 मराठीने याबाबत वृत्त दिले आहे.