Eknath Shinde | वाघाचे कातडे पांघरणाऱ्या शेळ्या कधीच वाघ होणार नाहीत, शिंदेंची ठाकरेंवर घणाघाती टीका

Eknath Shinde | वाघाचे कातडे पांघरणाऱ्या शेळ्या कधीच वाघ होणार नाहीत, शिंदेंची ठाकरेंवर घणाघाती टीका

Eknath Shinde | नकली वाघ कल्याण डोंबिवलीमध्ये येऊन पोकळ डरकाळ्या फोडून गेले. पण हा एकनाथ शिंदे रिंगमास्टर आहे, तोपर्यंत वाघाचे कातडे पांघरणाऱ्या शेळ्या कधीच वाघ होणार नाहीत, अशी घणाघाती टीका मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर केली. या देशात एकच वाघ होऊन गेला त्याचे नाव हिंदुह्रदयसम्राट बाळासाहेब ठाकरे आहे. अयोध्येत राम मंदीर झाले, बाळासाहेब असते तर भरभरुन कौतुक केले असते पण त्यांनी आनंदही व्यक्त केला नाही हे दुर्देवी आहे. त्यामुळेच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिलेली नकली शिवसेनाची उपमा योग्य आहे, असा टोला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी लगावला.

कल्याणचे खासदार श्रीकांत शिंदे यांच्या ‘‘विकास दशक- दहा वर्ष प्रगतीची, कल्याणच्या समृद्धीची’’ या कार्य अहवालाच्या प्रकाशन सोहळ्यात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे बोलत होते. यावेळी व्यासपीठावर शिवसेना, भाजप, राष्ट्रवादी काँग्रेस, मनसे आणि मित्रपक्षांचे आमदार आणि पदाधिकारी उपस्थितीत होते.

श्रीकांत शिंदे यांच्या अहवालातील प्रत्येक पानातून खासदाराने सर्व क्षेत्रात सर्वांगीण विकासाचे काम केल्याचे दिसून येते. एक आदर्श खासदार, लोकप्रतिनिधी इथल्या मतदारांनी दिल्लीत पाठवला. कार्यअहवाल पाहून अभिमान वाटला असे सांगत मुख्यमंत्री म्हणाले की श्रीकांतची गाडी राईट ट्रॅकवर आणि फुल स्पीडमध्ये आहे. तो आता खासदार नाही तर संसद रत्न आहे असे कौतुक त्यांनी केले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी श्रीकांतची कौतुकाने पाठ थोपटल्याची आठवण मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी यावेळी सांगितली.

सुरुवातीच्या पाच वर्षात श्रीकांत शिंदे याने कामाच्या माध्यमातून स्व:ताची ओळख निर्माण केली. इथले लोक सांगतात ‘फिर एकबार श्रीकांत ही खासदार’, कल्याणच्या जनतेने श्रीकांतला खासदार म्हणून स्वीकारले आहे, असे मुख्यमंत्री शिंदे यांनी सांगितले.

बाळासाहेबांचे विचार हीच आमची संपत्ती आणि ऐश्वर्य आहे, याउलट त्यांनी ५० कोटी रुपये बँक खात्यातून काढून घेतले कारण त्यांना आता आचार विचार उरलेला नाही, अशी टीका मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली. हनुमान चालिसा म्हटल्याने जेलमध्ये टाकणाऱ्या लोकांना या निवडणुकीत रामभक्त आणि हनुमानभक्त जागा दाखवतील, असा टोला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी महाविकास आघाडी सरकारला लगावला.

आपल्या भागातील बातम्या जाणून घेण्यासाठी जॉइन करा आझाद मराठीचा’चा व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप

महत्वाच्या बातम्या :

Chandrashekhar Bawankule | महाराष्ट्राचा महानालायक कोण? या स्पर्धेत उद्धव ठाकरे पहिले येतील, फडणवीसांवरील टीकेला बावनकुळेंचं प्रत्युत्तर

Sunil Tatkare | संविधान बचाव नावाने विरोधकांनी प्रचाराची वैचारिक पातळी खाली आणलीय

Narendra Modi | जनतेवर विश्वास नसलेल्या काँग्रेस आघाडीवर विश्वास ठेवू नका! पंतप्रधान मोदी यांचे आवाहन

Previous Post
Shrikant Shinde | मी डॉक्टर नसलो तरी अनेक सर्जरी केलेल्या आहेत, शिंदेंनी घेतली विरोधकांचा शेलक्या शब्दांत समाचार

Shrikant Shinde | मी डॉक्टर नसलो तरी अनेक सर्जरी केलेल्या आहेत, शिंदेंनी घेतली विरोधकांचा शेलक्या शब्दांत समाचार

Next Post
Raju Patil | ट्रीपल इंजिन सरकारला आता मनसेचे खरे इंजिन लागल्याने महायुती आणखीन स्पीड पकडेल

Raju Patil | ट्रीपल इंजिन सरकारला आता मनसेचे खरे इंजिन लागल्याने महायुती आणखीन स्पीड पकडेल

Related Posts
भाजपच्या जातीयवादी व धर्मवादी राजकारणाला कोल्हापूरकरांनी मुहतोड जवाब दिला -  राष्ट्रवादी 

भाजपच्या जातीयवादी व धर्मवादी राजकारणाला कोल्हापूरकरांनी मुहतोड जवाब दिला –  राष्ट्रवादी 

मुंबई   – राज्यात व देशात भाजपने जातीयवादी आणि धर्मवादी राजकारण परत सुरू केले आहे त्याला मुहतोड जवाब कोल्हापुरकरांनी…
Read More
हे जेल चेहऱ्यावर महिनाभर लावा अन् तरुण दिसा, तांदूळ आणि कोरफड घालून असे तयार करा | Skin Care Jail

हे जेल चेहऱ्यावर महिनाभर लावा अन् तरुण दिसा, तांदूळ आणि कोरफड घालून असे तयार करा | Skin Care Jail

Skin Care Jail | वाढत्या वयानुसार चेहऱ्यावर डाग आणि सुरकुत्या वाढू लागतात. योग्य काळजी न घेतल्यास वृद्धत्व वयाच्या…
Read More
uddhav thackeray - ranjit bagal

‘…तर सरकारने शेतकऱ्यांना गांजा लागवडीची परवानगी द्यावी’

सोलापूर : सरकारने वाईन् व मध्यसदृश्य पदार्थास किराणा दुकाने व माॅल्स इ.ठिकाणी विक्रीसाठी परवानगी दिली आहे.. या माध्यमातून…
Read More