भाजपच्या उमेदवारचे डिपॉझिट कोणत्याही परिस्थितीत जप्त झाले पाहिजे – छगन भुजबळ

नांदेड : रावसाहेब अंतापुरकर यांच्या निधनानंतर लागलेल्या देगलूर- बिलोली विधानसभा पोटनिवडणुकीचा प्रचार जोरदार सुरू आहे. महाविकास आघाडीचे सर्वच दिगग्ज नेते प्रचाराच्या रणधुमाळीत उतरले आहेत. राष्ट्रवादीचे जेष्ठ नेते छगन भुजबळ यांनी काँग्रेसचे उमेदवार जितेश अंतापुरकर यांच्या प्रचारार्थ देगलूर मध्ये सभा घेतली. देगलूर येथील लोहिया मैदान याठिकाणी देगलूर- बिलोली विधानसभा पोटनिवडणुकितील महाविकास आघाडीचे उमेदवार जितेश रावसाहेब अंतापुरकर यांच्या प्रचारार्थ आज सभा पार पडली. या जाहीर सभेत भुजबळांनी भाजपवर जोरदार प्रहार केला आहे.

देगलूर- बिलोली विधानसभा मतदारसंघाच्या या पोटनिवडणुकीत सर्वांनी आप आपसातले वाद मिटवत एकत्र आले पाहिजे आणि भाजपच्या उमेदवारचे डिपॉझिट कोणत्याही परिस्थितीत जप्त झाले पाहिजे असे आवाहनच देगलूर वासीयांना भुजबळ यांनी केले आहे.

राज्यात असलेले महाविकास आघाडी सरकार हे मजबुतीने उभे आहे.आणि आम्हीच देगलुरच्या विकासासाठी कटीबद्ध असल्याचे प्रतिपादन भुजबळ यांनी केले.

तर, ही सभा मला मोठ्या दुःखद अंतकरणाने घ्यावी लागत आहे. कै.रावसाहेब अंतापुरकर यांनी कोरोना काळात सर्व सामान्यांची सेवा केली आणि त्यातच त्यांचा मृत्यू झाला. कोरोनाकाळात देखील त्यांचे जनसेवेचे काम चालू होते अश्यातच त्यांना कोरोनाची लागण झाली आणि त्यांचा मृत्यू झाला. आता जी निवडणूक होणार आहे त्यात रावसाहेबांचा मुलगा श्री. जितेश रावसाहेब अंतापुरकर हा महाविकास आघाडीतर्फे उभा आहे. जितेश हा उच्च शिक्षित आहे. आपले शिक्षण पूर्ण करून तो स्वतःच्या पायावर उभा होता. मात्र दुर्दैवाने रावसाहेबांचा मृत्यू झाला आणि जितेशला निवडणुकीत भाग घ्यावा लागला आता आपली जबाबदारी आहे त्याला विजयी केले पाहिजे. अस भुजबळ म्हणाले आहेत.

दरम्यान, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार, महसूलमंत्री बाळासाहेब थोरात, नांदेडचे पालकमंत्री अशोक चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली महाविकास आघाडी योग्य पद्धतीने काम करत आहे. कोरोना काळात भाजपचे सरकार ज्या राज्यात आहे त्या उत्तर प्रदेश, आणि बिहार राज्याची परिस्थिती तुम्हाला माहीत आहे. त्याच्या कित्येक पटीने चांगले काम महाराष्ट्र राज्याने केले आहे. असं देखील छगन भुजबळ म्हणाले आहेत.

हे ही पहा: