Raju Patil | ट्रीपल इंजिन सरकारला आता मनसेचे खरे इंजिन लागल्याने महायुती आणखीन स्पीड पकडेल

Raju Patil | डॉ. श्रीकांत शिंदे याच्या रूपाने आपण आदर्श लोकप्रतिनिधी आणि आदर्श खासदार दिल्लीला पाठवला असल्याचे गौरवोद्गार राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी आज डोंबिवलीत काढले. कल्याण लोकसभेचे खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी गेल्या दहा वर्षांत केलेल्या विकासकामांच्या कार्य अहवालाचे प्रकाशन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह सार्वजानिक बांधकाम मंत्री रविंद्र चव्हाण, मनसे आमदार राजू पाटील (Raju Patil) आदी महायुतीच्या प्रमूख नेत्यांच्या उपस्थितीत डोंबिवलीतील सावित्रीबाई फुले रंगमंदिरात करण्यात आले. त्यावेळी मुख्यमंत्री यांनी दिलखुलासपणे खासदार डॉ. शिंदे यांनी दहा वर्षात केलेल्या विकासकामांचे कौतुक केले. डोंबिवलीमधील सावित्रीबाई फुले नाट्यगृहात आज श्रीकांत शिंदे यांच्या कार्य अहवाल प्रकाशन सोहळा पार पडला. यातच बोलताना ते असं म्हणाले आहेत.

यावेळी मनसे आमदार राजू पाटील यांनी श्रीकांत शिंदे यांच्यासाठी आम्ही मन लावून काम करणार असल्याचे सांगितले. या ट्रीपल इंजिन सरकारला आता मनसेचे खरे इंजिन लागले असून आता तर ही महायुती आणखीनच स्पीड पकडेल. त्यामुळे डॉ. श्रीकांत शिंदे हे येत्या निवडणुकीत नक्कीच तिसऱ्यांदा हॅटट्रिक मारतील असा ठाम विश्वास यावेळी मनसे आमदार राजू पाटील यांनी व्यक्त केला. खासदार डॉ. शिंदे यांना जशी हनुमान चालीसा पाठ आहे तशीच कल्याण लोकसभेत त्यांनी केलेली सर्व कामेही पाठ आहेत. त्यांचे निश्चितच कौतुक केले पाहिजे असे सांगत मनसे संपूर्ण ताकदीने काम करून विजयापर्यंत पोहचण्यासाठी आमचा खारीचा वाटा उचलू अशी ग्वाही मनसे आमदार राजू पाटील यांनी यावेळी दिली.

आपल्या भागातील बातम्या जाणून घेण्यासाठी जॉइन करा आझाद मराठीचा’चा व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप

महत्वाच्या बातम्या :

Chandrashekhar Bawankule | महाराष्ट्राचा महानालायक कोण? या स्पर्धेत उद्धव ठाकरे पहिले येतील, फडणवीसांवरील टीकेला बावनकुळेंचं प्रत्युत्तर

Sunil Tatkare | संविधान बचाव नावाने विरोधकांनी प्रचाराची वैचारिक पातळी खाली आणलीय

Narendra Modi | जनतेवर विश्वास नसलेल्या काँग्रेस आघाडीवर विश्वास ठेवू नका! पंतप्रधान मोदी यांचे आवाहन