Shrikant Shinde | मी डॉक्टर नसलो तरी अनेक सर्जरी केलेल्या आहेत, शिंदेंनी घेतली विरोधकांचा शेलक्या शब्दांत समाचार

डॉ. श्रीकांत शिंदे (Shrikant Shinde) याच्या रूपाने आपण आदर्श लोकप्रतिनिधी आणि आदर्श खासदार दिल्लीला पाठवला असल्याचे गौरवोद्गार राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज डोंबिवलीत काढले. कल्याण लोकसभेचे खासदार डॉ. श्रीकांत शिंदे ((Shrikant Shinde)) यांनी गेल्या दहा वर्षांत केलेल्या विकासकामांच्या कार्य अहवालाचे प्रकाशन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह सार्वजानिक बांधकाम मंत्री रविंद्र चव्हाण, मनसे आमदार राजू पाटील आदी महायुतीच्या प्रमूख नेत्यांच्या उपस्थितीत डोंबिवलीतील सावित्रीबाई फुले रंगमंदिरात करण्यात आले. त्यावेळी मुख्यमंत्री यांनी दिलखुलासपणे खासदार डॉ. शिंदे यांनी दहा वर्षात केलेल्या विकासकामांचे कौतुक केले.

विरोधकांचा शेलक्या शब्दांत समाचार…
श्रीकांत शिंदे डॉक्टर असले आणि आपण डॉक्टर नसलो तरी आपण अनेक सर्जरी केलेल्या आहेत. काही लोकांचे गळ्याचे पट्टे गायब झाले, काही लोकं फास्ट फिरायला लागले, चालायला लागले, तेदेखील गरजेचे होते. जेव्हा आम्ही 2022 ला सरकार स्थापन केलं. त्यावेळची परिस्थिती आपल्याला माहीत आहे. शेवटी सहकार्य योगदान मागायचे असते. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्याकडून सहकार्य मागण्यासाठी कशाला काही वाटायला हवे. विकासासाठी आम्ही सहकार्य मागत असतो. मात्र अहंकारी लोकं आपल्या इगोसाठी राज्याचे नुकसान करतानाही आपण बघितल्याची टिकाही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी कोणाचेही नाव न घेता त्यांनी विरोधकांवर केली. तसेच तर खरे वाघ आम्हीच असून काही नकली वाघ कल्याण डोंबिवलीमध्ये येऊन पोकळ डरकाळ्या फोडून गेले. परंतु हा एकनाथ शिंदे रिंगमास्टर असून वाघाचे कातडे पांघरलेल्या शेळ्या आपण चांगल्याप्रकारे ओळखून असल्याचे सांगत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विरोधकांचा खरपूस समचार घेतला.

आपल्या भागातील बातम्या जाणून घेण्यासाठी जॉइन करा आझाद मराठीचा’चा व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप

महत्वाच्या बातम्या :

Chandrashekhar Bawankule | महाराष्ट्राचा महानालायक कोण? या स्पर्धेत उद्धव ठाकरे पहिले येतील, फडणवीसांवरील टीकेला बावनकुळेंचं प्रत्युत्तर

Sunil Tatkare | संविधान बचाव नावाने विरोधकांनी प्रचाराची वैचारिक पातळी खाली आणलीय

Narendra Modi | जनतेवर विश्वास नसलेल्या काँग्रेस आघाडीवर विश्वास ठेवू नका! पंतप्रधान मोदी यांचे आवाहन