Archana Patil: मराठा आंदोलनादरम्यान गोळीबारात जखमी झालेल्या वाघमारे कुटुंबानी घेतली अर्चना ताईंची भेट

Archana Patil: धाराशिव लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सर्वच उमेदवार मतदारांशी संवाद साधताना दिसत आहेत. लोकसभा निवडणूक जाहीर होण्यापूर्वी मराठा आरक्षणाचा  प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला होता. यापूर्वी झालेल्या मराठा आरक्षण आंदोलना दरम्यान झालेल्या गोळीबारात आंदोलक दत्ता वाघमारे जखमी झाले होते, त्यांच्यावर सर्व उपचार महायुतीच्या लोकसभा उमेदवार अर्चना पाटील (Archana Patil) यांच्या कुटुंबीयांनी केले, आज वाघमारे कुटुंबीयांनी अर्चना ताईंची भेट घेऊन त्यांना निवडणुकीसाठी शुभेच्छा दिल्या.

लोकसभा निवडणुकीच्या प्रचारा दरम्यान अर्चना पाटील यांनी कळंब तालुक्यातील सातेफळ येथे नागरिकांच्या भेटी घेऊन संवाद साधला. गावकऱ्यांच्या उस्फुर्त प्रतिसादात कॉर्नर सभा संपन्न झाली.. याच गावातील मराठा आंदोलन  दत्ता वाघमारे यांच्यावर २०१७ साली गोळीबार झाला होता, त्यात ते गंभीर जखमी झाले होते. त्यांना हॉस्पिटल मध्ये दाखल करुन घेण्यापासून ते डिस्चार्ज होईपर्यंत कुटुंबातील सदस्याप्रमाणे संपूर्ण पाटील कुटुंबीयांनी काळजी घेऊन त्यांचा जीव वाचवला. आज संपूर्ण वाघमारे  कुटुंबीयांनी अर्चना पाटील यांच्या बैठक स्थळी भेट देऊन शुभेच्छा दिल्या.

आपल्या भागातील बातम्या जाणून घेण्यासाठी जॉइन करा आझाद मराठीचा’चा व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप

महत्वाच्या बातम्या :

Archana Patil | अर्चना पाटील यांच्या विजयासाठी उपमुख्यमंत्री अजित पवार करतायत सर्वतोपरी प्रयत्न

Omraje Nimbalkar Vs Archana Patil: धाराशिवचे उमेदवार ओमराजे निंबाळकर व अर्चना पाटील यांची संपत्ती किती?

Uddhav Thackeray | फडणवीस म्हणाले होते आदित्यला मुख्यमंत्रिपदासाठी तयार करतो अन् मी दिल्लीला जातो; ठाकरेंचा दावा