मराठी तरुणीला मुंबईत घर नाकारणाऱ्या व्यक्तीचा मनसेकडून ‘करेक्ट कार्यक्रम’, राज ठाकरे म्हणाले…

Mulund Incident: मुंबईतील मुलुंड भागात कार्यालयासाठी भाड्याने जागा घेण्यासाठी गेलेल्या मराठी तरुणीला `इथे महाराष्ट्रीयन लोकांना जागा नाही`, असे म्हणत धक्काबुक्की केली. खुद्द महिलेनेच याबाबत सांगितले. या प्रकरणी राजकीय वर्तुळातून प्रतिक्रिया समोर येत आहेत. अशातच मनसेचे अध्यक्ष आणि मराठी माणसाच्या हक्कासाठी नेहमी पुढे असणारे राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी यावर प्रतिक्रिया दिली आहे.

मुंबईत, मुलुंडमध्ये एका मराठी स्त्रीला, ती मराठी आहे म्हणून व्यवसायासाठी जागा नाकारल्याची घटना समोर आली. इतरांनी निषेध वैगरे व्यक्त केला. आम्हाला निषेध नोंदवणं इत्यादी प्रकार माहित नाहीत. त्यामुळे माझ्या महाराष्ट्र सैनिकांनी आमच्या पद्धतीने दम दिल्यावर त्या बिल्डिंगच्या सचिवाने माफीनामा दिला. हे असले प्रकार खपवून घेतले जाणार नाहीत. मुंबईत, महाराष्ट्रात जर पुन्हा हे असं काही घडलं तर गालावर वळ उठतील हे निश्चित. आणि सरकारने पण जरा आपला धाक दाखवला पाहिजे.

काल मुलुंडमध्ये माझ्या महाराष्ट्र सैनिकांनी जाऊन जी समज दिली त्यांचं मनापासून अभिनंदन. तुमचं कायम लक्ष असतंच आणि मराठी माणसावर कुठेही अन्याय झालं तर त्याला महाराष्ट्र नवनिर्माण सेनाच आठवते. हे असंच सुरु राहिलं पाहिजे. अन्याय दिसेल तिथे तुमची लाथ बसलीच पाहिजे !, असे ट्वीट करत राज ठाकरेंनी आपली भूमिका मांडली आहे.

https://youtu.be/gCfxHtR26Wo?si=MEthSTF6L7ExyINO

महत्वाच्या बातम्या-

Pune Ganeshotsav 2023 : गणपती विसर्जन मिरवणुकीत हृदयविकाराचा झटका आल्याने पुण्यात 23 वर्षीय तरुणाचा दुर्दैवी मृत्यू ?

Ganesh Visarjan 2023: पुण्यातील मानाचे कसबा गणपतीच्या मिरवणुकीला सुरूवात

नवरात्रीत स्वत:ला एक सुंदर लुक द्यायचा असेल तर या टिप्स अवश्य फॉलो करा