महाराष्ट्राच्या राजकारणातील सर्वात मोठी बातमी! ठाकरेंच्या हातून शिवसेना गेली, पक्षाचं नाव आणि चिन्ह शिंदे गटाकडे

मुंबई- राजकीय क्षेत्रातून सर्वात मोठी बातमी पुढे येत आहे. गेल्या काही महिन्यांपासून ठाकरे गट आणि शिंदे गटात शिवसेना पक्षाचे नाव आणि चिन्हावरुन सुरू असलेल्या वादाबाबत आज अखेर अंतिम निर्णय लागला आहे. शिवसेना पक्षाचे नाव आणि धनुष्यबाण हे निवडणूक चिन्ह मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गटाला मिळाले आहे. केंद्रिय निवडणूक आयोगाने हा मोठा निर्णय घेतला आहे. शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांच्यासाठी हा खूप मोठा झटका आहे.