जाता जाता राष्ट्रवादीने भगतसिंह कोश्यारींची घेतली ‘शाळा’, टिकात्मक पोस्टद्वारे उपटले कान!

मुंबई : वादग्रस्त वक्तव्यामुळे चर्चेच असलेले राज्याचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी (Bhagat Singh Koshyari) राज्यपाल पदापासून मुक्त होणार आहे.  राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी पदमुक्त होण्याची इच्छा पतंप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांच्याकडे केली होती. त्यानंतर राष्ट्रपती द्रौपद्री मुर्मू यांनी राज्याच्या राज्यपाल पदी रमेश बैस (Ramesh Bais) यांची नियुक्ती केली आहे. ते लवकरच राज्याच्या राज्यपाल पदाची शपथ घेणार आहेत. त्या आधी राष्ट्रवादीने (NCP) भगतसिंह कोश्यारी यांच्याबाबत टिकात्मक पोस्ट शेअर केली आहे.

महापुरूषांबाबत केलेल्या वक्तव्यावरून राष्ट्रवादीने राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्याविरोधात रान पेटवलं होतं. अनेक शहरात राष्ट्रवादीसह आघाडीतील अनेक नेत्यांनी राज्यपालांच्या विरोधात प्रखर शब्दात टिका केली होती. टिकात्मक पोस्ट शेअर केली आहे. यामध्ये त्यांनी एक पत्र लिहिलं आहे. त्यात त्यांनी असं म्हटलं आहे की, पत्रास कारण की, आमच्या शाळेतील भगतसिंह कोश्यारी नामक विद्यार्थ्याला तात्काळ शाळेतून कमी करण्यात आले आहे. सदरहू विद्यार्थ्याबाबत अनेक तक्रारी प्राप्त झाल्यामुळे तसेच विद्यार्थ्याने सुधारणेचे कोणतेही चिन्ह न दाखवल्याने अखेर त्याची गच्छंती करण्यात येत आहे.

तसेच पुढे त्यांनी असं म्हटलं आहे की, सदरहू विद्यार्थ्याची बौद्धीक क्षमता अगदीच तोकडी मनोरंजनपर विषयात गती असली तरी बाकी विषयांचा अभ्यास फार कच्चा आहे. आपली जबाबदारी ओळखण्याऐवजी इतर विद्यार्थ्याविषयी चुकीची माहिती पसरवण्याचे काम विद्यार्थ्याने केले आहे. तसेच खोडसाळपणा, नियमांचे उल्लंघन, शाळेतील शांततेचा भंग करणे आणि वाद निर्माण करणे अशी कृत्ये विद्यार्थी सातत्याने करत असतो. या वृत्तीमुळे तुमच्या शाळेतील इतर विद्यार्थ्यांवरही संगतीचा वाईट परिणाम होऊ शकतो. त्यामुळे सदर विद्यार्थ्यास शाळेत प्रवेश देण्याचा विचार असल्यास वरील सर्व बाबींची गंभीर नोंद घ्यावी, ही विनंती.

आपला नम्र,
मुख्याध्यापक
व्हॉटस्अॅप विद्यालय