Nitesh Rane | पहिल्या दिवसापासून जरागेंना सांगतोय राजकीय टीका करु नका, भाजप नेते नितेश राणेंचा इशारा

Nitesh Rane : १० फेब्रुवारीपासून उपोषणाला बसलेल्या मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींची महाराष्ट्रातील सभा उधळून लावू असे भाष्य केले होते. यावर प्रत्युत्तर देताना केंद्रिय मंत्री नारायण राणे (Narayan Rane) यांनी मनोज जरांगेंवर बोचरी टीका केली होती. आता नारायण राणेंच्या समर्थनार्थ मुलगा आणि भाजप नेते नितेश राणे मैदानात उतरले आहेत. राजकीय टीका करु नका, असा इशारा नितेश राणे (Nitesh Rane) यांनी मनोज जरागेंना दिलाय.

केंद्रीय मंत्री नारायण राणे आणि राणे कुटुंबियांनी मराठा समाजासाठी काय केलं? हे आम्हाला सांगण्याची गरज नाही. समाजासाठी काही करु शकलो तर ते आम्ही आमचे कर्तव्य मानतो. मराठा स्वतःच्या हक्काचे टिकणारे आरक्षण मिळावे हीच आमची पहिल्या दिवसापासून भूमिका राहिलेली आहे. यासाठी आम्ही सहभाग घेतलेला आहे. मराठा समाजाच्या आरक्षणासाठी आम्हीही संघर्ष केलाय. फक्त पहिल्या दिवसापासून मी जरागेंना सांगतोय की तुम्ही राजकीय टीका करु नका, असे आवाहन नितेश राणे यांनी जरांगे पाटील यांना केले आहे.

आपण जबाबदारीने मराठा समाजाच्या आरक्षणाचा प्रवास अंतिम टप्प्यावर घेऊन गेलेलो आहोत. काही दिवसात मराठा समाजाला स्वतःचं हक्काचे आरक्षण मिळेल अशी परिस्थिती आहे. समाज बांधव म्हणून जरांगे यांना आणि सहकार्यांना सांगेन आपल्यात एकजूट कायम ठेवण्याच काम केले पाहिजे. राणे कुटूंब म्हणून आम्ही आजही समाजासोबत आहोत आणि कायम राहू, असेही नितेश राणे यांनी स्पष्ट केले.

महत्वाच्या बातम्या

NCP MLA Disqualification : राष्ट्रवादी अजितदादांचीच, शरद पवार यांना मोठा धक्का

Jagdish Mulik | पुणे लोकसभा निवडणुकीसाठी जगदीश मुळीकांच्या उमेदवारीची शक्यता वाढली

Surya Ghar Yojana | मोफत वीज योजनेसाठी नोंदणी झाली सुरू, असा करू शकता अर्ज