Devendra Fadnavis | “मला अनेकदा वाटतं अमृताच्या तोंडाला चिकटपट्टी लावावी असं वाटतं”, देवेंद्र फडणवीस काय बोलून गेले?

Devendra Fadnavis On Amruta Fadnavis: महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्या पत्नी अमृता फडणवीस या नेहमी कोणत्या ना कोणत्या कारणामुळे चर्चेत असतात. त्या बऱ्याचदा मीडियापुढे देवेंद्र फडणवीस यांच्याबद्दल गौप्यस्फोट करत असतात, ज्यामुळे नंतर भाजप नेत्याला अडचणींचा सामना करावा लागतो. महाराष्ट्रात महाविकास आघाडी सरकार कोसळल्यानंतर फडणवीस वेश बदलून बाहेर फिरत असत, असा खुलासा अमृता फडणवीस (Amrita Fadnavis) यांनी दोन वर्षांपूर्वी केला होता. आता देवेंद्र फडणवीस यांनी यावर प्रतिक्रिया दिली आहे.

जून २०२२ मध्ये महाविकास आघाडीचं सरकार पडलं. त्यानंतर जुलै महिन्यात झालेल्या मुलाखतीत अमृता फडणवीस (Devendra Fadnavis) म्हणाल्या होत्या, “देवेंद्र हुडी घालून आणि मोठा चष्मा लावून बाहेर पडत असत. मला सुद्धा ते ओळखायला यायचे नाहीत. मी त्यांना विचारलं की हे काय चाललं आहे? ते म्हणायचे काही नाही. पण मला तेव्हा वाटायचं की काहीतरी सुरु आहे.”

यावर आता मिश्किल टिप्पणी करताना देवेंद्र फडणवीस म्हणाले, “अमृताने जे सांगितलं आहे ते खोटं आहे कसं काय म्हणणार? राजकीय बाबतीत माझी एक इच्छा असते अर्थात माझी तेवढी हिंमत नाही. पण त्यांच्या तोंडाला चिकटपट्टी लावली तर बरं होईल, कारण असे सिक्रेट त्यांनी सांगितलेत ते काय करायचं? पण तो काळ आता गेला. आता काही चमत्कार करण्याची आवश्यकता नाही.” असं मिश्किल उत्तर देवेंद्र फडणवीस यांनी दिलं आहे. लोकमतला दिलेल्या मुलाखतीत देवेंद्र फडणवीस यांनी हे वक्तव्य केलं आहे. जे चांगलंच चर्चेत आहे.

महत्वाच्या बातम्या

NCP MLA Disqualification : राष्ट्रवादी अजितदादांचीच, शरद पवार यांना मोठा धक्का

Jagdish Mulik | पुणे लोकसभा निवडणुकीसाठी जगदीश मुळीकांच्या उमेदवारीची शक्यता वाढली

Surya Ghar Yojana | मोफत वीज योजनेसाठी नोंदणी झाली सुरू, असा करू शकता अर्ज