शाहरुख खानसोबत काम केलेल्या अभिनेत्याचा वयाच्या ५१व्या वर्षी हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू

Nitesh Pandey Passed Away : भारतीय टेलिव्हिजन इंडस्ट्रीसाठी बुधवार (२४ मे) हा काळा दिवस ठरला आहे. आज टेलिव्हिजन इंडस्ट्रीतील दोन मोठ्या चेहऱ्यांनी जगाचा निरोप घेतला आहे. प्रसिद्ध टेलिव्हिजन अभिनेत्री वैभवी उपाध्याय (Vaibhavi Upadhyay) हिचा कार अपघातात मृत्यू झाल्याची बातमी बुधवारी सकाळी समोर आली. त्याचवेळी भारतीय टेलिव्हिजन इंडस्ट्रीतील प्रसिद्ध चेहरा नितेश पांडे (Nitesh Pandey) यांच्या निधनाची बातमीही समोर येत आहे. (Anupamaa Actor Nitesh Pandey Death News)

हिंदी सिरियल अनुपमा फेम अभिनेता नितेश पांडे यांचे निधन झाले आहे. रूपाली गांगुलीच्या हिट टीव्ही शोमध्ये धीरज कपूरची भूमिका साकारण्यासाठी नितेश पांडे प्रसिद्ध होते. नितेश यांचे वयाच्या ५१ व्या वर्षी हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाल्याचे सांगण्यात येत आहे. मृत्यूसमयी ते मुंबईतील इगतपुरी येथे होते.

गेल्या २५ वर्षांपासून नितेश भारतीय टेलिव्हिजनमधील एक ओळखीचा चेहरा होते. नितेश हे उत्तराखंडमधील अल्मोरा कुमाऊं येथील रहिवासी होते आणि त्यांनी अभिनेत्री अर्पिता पांडे हिच्याशी लग्न केले होते, जिला ते जस्टजू या टीव्ही शोमध्ये भेटले होते. 2003 मध्ये त्यांनी लग्न केले. नितेशचे यापूर्वी अभिनेत्री अश्विनी काळसेकर हिच्यासोबत लग्न झाले होते.

नितेश पांडे यांनी १९९० मध्ये थिएटर करायला सुरुवात केली होती. १९९५ मध्ये, नितेश पांडेने तेजसमध्ये काम केले ज्यामध्ये त्यांनी गुप्तहेराची भूमिका केली होती. नितेश पांडेने मंझिले अपना अपना, अस्तित्व… एक प्रेम कहानी, साया, जस्तजू आणि दुर्गेश नंदिनी यांसारख्या मालिकांमध्ये काम केले होते. नितेश पांडेने बॉलिवूडमध्येही चांगले काम केले होते.  त्यांनी शाहरुख खानच्या ओम शांती ओम आणि बधाई दो सारख्या चित्रपटातही काम केले होते. नितेश पांडे यांनी ड्रीम कॅसल प्रॉडक्शन नावाचे स्वतंत्र प्रॉडक्शन हाऊसही चालवले. नितेश पांडे शेवटचे अनुपमा आणि प्यार का दर्द है मीठा मीठा प्यारा प्यारा मध्ये दिसले होते.