देशभरातील सर्व हिंदू बांधवांना माझं सांगणं आहे की, तयारीत रहा, भोंगे न हटवल्यास…; ठाकरेंचा इशारा

पुणे – हिंदुत्वाचा (Hindutva) आवाज बुलंद करणारे  मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) हे सध्या पुणे दौऱ्यावर आहेत. शनिवारी हनुमान जयंतीनिमित्त सामूहिक हनुमान चालिसा पठण केल्यानंतर राज ठाकरे पत्रकार परिषद (Press confrance)  घेतली.  यावेळी त्यांनी पत्रकार परिषदेतून दोन मोठ्या घोषणा केल्या आहेत.

५ जून रोजी माझ्या सर्व सहकाऱ्यांसह मी अयोध्येला जाणार आहे. पाच तारखेला अयोध्येला पोहचून तिथे दर्शन घेणार आहे, अशी घोषणा राज ठाकरे यांनी पत्रकार परिषदेतून केली आहे. यासोबतच महाराष्ट्र दिनी १ मे रोजी मी औरंगाबाद येथे जाहीर सभा घेणार आहे, अशी माहिती राज ठाकरे यांनी पत्रकार परिषदेतून दिली आहे.

योग्य वेळ आल्यावर मी इतर महत्वाच्या गोष्टी बोलणार आहे.  लोकांना वाटतंय की मशिदीचे भोंगे हा धार्मिक विषय आहे. परंतू तो सामाजिक विषय आहे हे आधीच मी स्पष्ट केले आहे. आमच्या या भोंग्यांच्या गोंगाटाचा हिंदू बांधवांनाच काय तर खुद्द मुस्लिम बांधवांनाही याचा त्रास होत आहे. देशभरातील सर्व हिंदू बांधवांना माझं सांगणं आहे की, तयारीत रहा, तीन तारखेपर्यंत रमजान सुरू आहे. तोपर्यंत काही बोलणार नाही. त्यानंतरही त्यांना कळलं नाही. आणि सर्वोच्च न्यायालयापेक्षा यांना स्वतःचा धर्म महत्वाचा वाटत असेल तर आपणही जशास तसे उत्तर देणं देखील तितकंच गरजेचं आणि आवश्यक आहे.

मनेसेची त्यासाठी सर्वबाजूने तयारी सुरू आहे. या देशातील महाराष्ट्रातील शांतता बिघडवायची आमची इच्छा नाही. मुस्लिम समुदायानेदेखील माणुसकीच्या विचारातून या गोष्टीकडे बघावं.असं आवाहन राज ठाकरे यांनी केले आहे.