Smart Farming : ‘या’ तीन भाज्यांची शेती करत फक्त १०० दिवसांत कमवा लाखो रुपये

एप्रिल महिना नुकताच संपला. खरीप पेरणीसाठी दोन ते तीन महिने शिल्लक आहेत. या फावल्या वेळेत भाजीपाला लागवड करून शेतकरी चांगला नफा कमवू शकतात. ज्या भाज्या 50 ते 100 दिवसांतच पिकवता येतात त्या भाज्यांची लागवड आम्ही तुम्हाला सांगणार आहोत. त्यांच्या लागवडीचा खर्चही कमी आहे. अशा परिस्थितीत शेतकरी हा भाजीपाला 2 ते 3 महिन्यात पिकवून चांगले उत्पन्न मिळवू शकतात. (Kheti Tips)

राजमाची लागवड
राजमाचे पीक 100 दिवसांत तयार होते. शेतकऱ्यांना एक एकरातून 10 ते 12 क्विंटल राजमा मिळतो. बाजारात 1 क्विंटल राजमाचा भाव 12 हजारांच्या जवळपास राहिला आहे. अशा परिस्थितीत 30 ते 35 हजार खर्चात 12 क्विंटल राजमाचे उत्पादन घेऊन शेतकरी 1 लाख रुपयांहून अधिक नफा सहज कमवू शकतात.

भेंडीची शेती
पेरणीनंतर अवघ्या 50 दिवसांत भेंडीचे पीक तयार होते. शेतकरी एक एकरात 80 क्विंटल भेंडी घेऊ शकतात. त्याच्या पेरणीसाठी 20 ते 25 हजार खर्च येतो. बाजारात भेंडीचा भाव 3000 रुपये प्रतिक्विंटल आहे. 80 क्विंटल उत्पादनातून शेतकरी 1.50 ते 2 लाख रुपये सहज कमवू शकतात.

कारले शेती
कारल्याचे पीक 55 दिवसांत तयार होते. एक एकर कारल्याच्या लागवडीसाठी सुमारे 55 हजारांचा खर्च येणार आहे. यामध्ये किमान 100 क्विंटल कारल्यांचे उत्पादन होऊ शकते. बाजारात विकून तुम्ही फक्त 100 दिवसात 1.50 लाख कमवू शकता.