Ravindra Jadeja | चेपॉकच्या मैदानावर जडेजाने घेतली चाहत्यांची फिरकी, सपोर्ट स्टाफही हसून बेजार… VIDEO होतोय व्हायरल

Ravindra Jadeja | आयपीएल 2024 मध्ये चेपॉक मैदानावर चेन्नई सुपर किंग्जचा सामना कोलकाता नाइट रायडर्सशी झाला. शिवम दुबे सामन्याच्या शेवटच्या क्षणी बोल्ड झाला. त्यावेळी चेन्नईला विजयासाठी फक्त 3 धावांची गरज होती. महेंद्रसिंग धोनी 7-8 व्या क्रमांकावर फलंदाजीला येतो. तरीही, चेपॉकच्या चाहत्यांना या मोसमात धोनीला प्रथमच त्यांच्या मैदानावर फलंदाजी करताना पाहण्याची संधी मिळेल अशी आशा होती.

जडेजाने चाहत्यांची मजा घेतली
महेंद्रसिंग धोनी फलंदाजीला येणार या अपेक्षेने चाहते खूप उत्सुक होते. तेवढ्यात रवींद्र जडेजा (Ravindra Jadeja) बॅटिंग किट घालून ड्रेसिंग रूममधून बाहेर आला. जणू काही तो फक्त फलंदाजीसाठी जात होता. दरम्यान, प्रेक्षकांचा आवाज थोडा कमी झाला पण नंतर थोडे पुढे गेल्यावर जडेजाने यू-टर्न घेतला आणि ड्रेसिंग रूममध्ये परत गेला. हे पाहून सीएसकेच्या डगआऊटमध्ये बसलेल्या सपोर्ट स्टाफलाही हसू आवरता आले नाही.

धोनी पुन्हा मैदानात आला
रवींद्र जडेजा आत गेल्यानंतर महेंद्रसिंग धोनी ड्रेसिंग रूममधून बाहेर आला. ड्रेसिंग रूममधून बाहेर येताच लोकांचा उत्साह पाहण्यासारखा होता. संपूर्ण स्टेडियम नाचत होते. धोनी चौकार मारून सामना संपवेल, अशी चाहत्यांची अपेक्षा होती. पण असे झाले नाही. धोनीने 3 चेंडूत एका धावेची नाबाद खेळी केली. तो सामन्यातील विजयी शॉटही खेळू शकला नाही.

आपल्या भागातील बातम्या जाणून घेण्यासाठी जॉइन करा आझाद मराठीचा’चा व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप

महत्वाच्या बातम्या :

Murlidhar Mohol | सहाही विधानसभा मतदारसंघात मताधिक्य घेणार, पुणेकर माझ्या पाठीशी; मुरलीअण्णांनी व्यक्त केला विश्वास

Sunetra Pawar | अजितदादा ज्यावेळी एखादी भूमिका घेतात, त्यावेळी…; सुनेत्रा पवारांकडून अजितदादांचे कौतुक

Murlidhar Mohol | त्यांना निधी मिळाला, मला जनतेचे प्रेम मिळतेय; मुरलीधर मोहोळ यांचा धंगेकरांना टोला