बचत गटाच्या महिलांचे सक्षमीकरण पुणे महानगरपालिकेच्या माध्यमातून व्हावे – हर्षदा फरांदे

Harshada Farande– पुणे शहारामध्ये मोठ्या संख्येने महिला गृहिणी बचतगटाच्या माध्यमातून विविध वस्तूंचे उत्पादन व विक्री करतात व त्यातून आपला उदरनिर्वाह चालवतात. परंतु जागेअभावी त्यांना त्यांच्या वस्तूंचे उत्पादन व विक्री करण्यात मर्यादा येतात या बाबत आज भारतीय जनता पार्टीच्या महिला मोर्चाच्या शिष्टमंडळाने शहराध्यक्षा हर्षदा फरांदे यांच्या नेतृत्वात पुणे महानगरपालिका आयुक्त विक्रमकुमार यांची भेट घेऊन त्यांना निवेदन दिले.

पुणे म्हणारपालिकेने क्षेत्रीय कार्यलयाच्या हद्दीत पुणे महानगरपालिकेच्या जागा सदर बचत गट महिलांना उपलब्ध करून दिल्यास त्यांना योग्य प्रशिक्षण देऊन त्यांनी उत्पादित केलेल्या वस्तूंच्या विक्रीस बाजारपेठ उपलब्ध करुन सामान्य महिला भगिनींना अधिक सक्षम करता येऊ शकेल. आठवडे बाजाराच्या धर्तीवर अशी काही योजना बचत गटासाठी राबवता येऊ शकते काय, याचा विचार व अंमलबजावणी महानगरपालिकेने करावी. तसेच पुण्यात जवळपास ११०० सार्वजनिक स्वछतागृहे आहेत. ज्यापैकी बहुतांश स्वछतागृहे ही मोडकळीस आली आहेत, ती तातडीने दुरुस्त करून त्याची वेळोवेळी स्वछता केली जावी आदी मागण्या या निवेदनात करण्यात आल्या.

या शिष्टमंडळात फरांदे यांच्या सह महिला सरचिटणीस गायत्री खडके, आरती कोंढरे,उज्वला गौड, भावना शेळके ,शामा जाधव ,प्रियांका शेंडगे आदी उपस्थित होत्या.

महत्वाच्या बातम्या-

तीन राज्यातील विजय ही लोकसभा विजयाची नांदी- धीरज घाटे

विधानसभा निवडणुकीतील जनतेचा कौल मान्य, लोकसभेला चित्र बदलून काँग्रेसच विजयी होईल – नाना पटोले

मोदींच्या गॅरेंटीवर जनतेचा अढळ विश्वास; चंद्रशेखर बावनकुळे यांचा दावा