एका राज्यसभेने मुख्यमंत्री बनता येत नाही, अनाजी पंतांना महाराष्ट्र स्विकारणार नाही – दिपाली सय्यद  

मुंबई :  राज्यसभा निवडणुकीत महाविकास आघाडीचे (MVA) तीन उमेदवार विजयी झाले आहे. तर भाजपचे तीन उमेदवार विजयी झाले आहे. पण, या निवडणुकीत महाविकास आघाडीला धक्का बसला आहे. कारण, महाविकास आघाडीची अनेक मते फुटली असल्याचे समोर आले आहे. या निवडणुकीत भाजपने केलेली खेळी यशस्वी झाली असून सहाव्या जागेवर भाजपच्या धनंजय महाडिकांचा विजय (BJP’s Dhananjay Mahadik’s victory) झाला आहे. विरोधीपक्ष नेते  देवेंद्र फडणवीस यांनी खेळलेल्या खेळीला यश आले आहे.

या निकालामुळे महाविकास आघाडीची डोकेदुखी वाढली असून शिवसेनेवर विरोधकांचे शरसंधान सुरु आहे. यातच आता शिवसेनेच्या नेत्या दिपाली सय्यद (Deepali sayyad) यांची प्रतिक्रिया आली आहे. त्या म्हणाल्या, एका राज्यसभेने मुख्यमंत्री बनता येत नाही,एका राज्यसभेने मुबंईचे महापौर बनता येत नाही,एका राज्यसभेने कोल्हापुर पोटनिवडणुक जिंकतां येत नाही. १०६ काय १३० असुद्या पण अनाजी पंतांना महाराष्ट्र स्विकारणार नाही. काही केले तरी पुन्हा येता येणार नाही. जगातील मोठा पक्ष एका राज्यसभेवर होत नाही. असं त्या म्हणाल्या आहेत.